शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

हिजाब नाकारणा-या हिना सिद्धूने इराणच्या जनतेची मने जिंकली

By admin | Published: October 31, 2016 8:26 PM

भारताची स्टार महिला नेमबाज हिना सिद्धू हिने हिजाब घालून खेळणे अनिवार्य असल्याचे समजताच इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - भारताची स्टार महिला नेमबाज हिना सिद्धू हिने हिजाब घालून खेळणे अनिवार्य असल्याचे समजताच इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. हिनाच्या या कृतीला इराणच्या नागरिकांचा भरघोस पाठिंबा लाभला. इराणच्या सर्वच महिला खेळाडूंना खेळताना हिजाब घालावाच लागतो. हिनानेहिजाबचा विरोध करीत तेथे आयोजित आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेवरच बहिष्कार टाकला. हिनाच्या या कृतीची इराणच्या सोशल मीडियावर वाहवा होत आहे. हिजाबच्या पक्षपाती कायद्यावर देखील या निमित्ताने टीकेची झोड उठली. अनेक जण हिनाच्या कृतीचे समर्थन करीत तिचे आभार मानत आहेत. फेसबुक पेजवर हिनाच्या कृतीचे तोंडभरून कौतुक सुरू झाले. या पेजवर हिनाचा फोटो प्रकाशित केला असून हिजाब न घातलेला हा फोटो आहे. सोबत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचेही छायाचित्र आहे. या फोटोत स्वराज डोक्यापासून पायापर्यंत झाकलेल्या आहेत. त्यांचा हा फोटो इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळेचा आहे.हिनाच्या निर्णयाचे स्वागत करीत या पेजवर लिहिण्यात आले,‘आम्ही इराणी नागरिक नसलेल्या अनेकांना इराणमध्ये आमंत्रित करतो. पण कुठल्याही परिस्थितीत हिजाब घालणे ही आमची संस्कृती नाही. महिलांविरुद्ध पक्षपात करणारा हा नियम आहे. सर्व महिलांना याविरुद्ध आवाज उठविण्याचे स्वातंत्र्य आहे.’ या पोस्टवर मोहम्मद सईदी लिहितात,‘राजकारण फार वाईट आहे. या सर्व गोष्टी राजकारणात मागे पडतात. भारतात खेळांचे राजकारण झाले नाही, ही चांगली बाब म्हणावी लागेल.’ फिरोज माहवी यांनी दुस-या एका पोस्टवर लिहिले,‘आशियाई विजेता हिनाने हिजाबचा विरोध करण्यासाठी नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली.परमेश्वराने या मुलीला आणधी ताकद द्यावी. हे परमेश्वरा, गेल्या ३७ वर्षांपासून थोपविण्यात आलेल्या हिजाब सक्तीविरुद्ध आवाज उठविणाºया सर्वच मुलींना तशी ताकद दे.’ दुसरीकडे हमिद्रेजा कंगरशाही या भारतीय खेळाडूच्या या कृतीवर नाराजदिसल्या. त्यांनी फेसबुकवर लिहिले,‘मी देखील अनिवार्य हिजाबच्या विरोधात आहे. पण भारतीय मुलींनी नेहमी कायद्याचे पालन करायला हवे.’