शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वेल्सचा ऐतिहासिक विजय

By admin | Published: July 03, 2016 4:23 AM

युरो २०१६ चषक स्पर्धेतील डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या गेराथ बॅलेच्या वेल्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बेल्जियमला ३-१ ने हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

लिली : युरो २०१६ चषक स्पर्धेतील डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या गेराथ बॅलेच्या वेल्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बेल्जियमला ३-१ ने हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तेथे आता त्यांची लढत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालशी होणार आहे. मोठ्या स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत धडक मारण्याची वेल्सची ही पहिलीच वेळ आहे.युरो चषकात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वेल्स संघाने आक्रमक खेळ करीत बेल्जियमला उपांत्यपूर्व फेरीतच गारद केले. वेल्सकडून कर्णधार अ‍ॅश्ले विलियम्स, हॉल रॉबसन कानू आणि सॅम वोक्स यांनी गोल नोंदवले. बेल्जियमकडून नॅनगोलानने एकमेव गोल केला. शुक्रवारी रात्री झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला. बेल्जियमला या सामन्यात विजेतेपदाचे दावेदार मानले जात असल्याने संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये बेल्जियमच्या चाहत्यांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली होती. या पाठिंब्याच्या जोरावर बेल्जियम संघानेही आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत सामन्यात पहिल्या गोलची नोंद केली. १३ व्या मिनिटालाच मिळालेल्या पासवर नॅनगौलनने कोणतीही चूक न करता गोल केला. पिछाडीवर पडलेल्या वेल्सने मग आपल्याही खेळाचा वेग वाढवला. त्यांच्या या प्रयत्नाला ३१ व्या मिनिटाला यश आले. कर्णधार अ‍ॅश्ले विलियम्सचा हेडर बेल्जियमच्या गोलकिपरला चकवून गोलपोस्टच्या कोपऱ्यात विसावला. मध्यंतराला दोन्ही संघात १-१ असे बरोबरीत होते.उत्तरार्धात, ५५ व्या मिनिटाला रॉबसनने एका सुरेख गोलची नोंद करून वेल्सला आघाडी मिळवून दिली. बॉक्समधील बचावफळीतील चार खेळाडूंना चकवून उत्कृष्ट पदलालित्य दाखवत केलेला हा गोल चाहत्यांच्या अनेक दिवस लक्षात राहील, असाच लाजवाब होता. सामना शेवटच्या टप्प्यात आला असता बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या सॅम वोक्सने ८५ व्या मिनिटाला गोल नोंदवून वेल्सचे सेमीफायनलचे तिकीट नक्की केले. विजयानंतर अनेक खेळाडू मैदानावर जल्लोष करीत होते, तर काही जणांना या ऐतिहासिक क्षणांवर विश्वासच बसत नव्हता.वेल्सचा संघ १९५८ मध्ये फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. परंतु तेथे त्यांचा ब्राझीलने १-० गोलने पराभव केला होता. विशेष म्हणजे हा विजयी गोल त्या वेळी पेले यांनी केला होता.सेमीफायनलमध्ये वेल्स आणि पोर्तुगाल हे दोन संघ समोरासमोर येतील. या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्तुगालचा रोनाल्डो आणि वेल्सचा गेराथ बॅले हे दोन मातब्बर खेळाडू रिआल माद्रिद या एकाच क्लबकडून खेळतात. त्यामुळे ही लढत रोमांचक होईल. आपण येथे मौज करण्यासाठी आलेलो नाही, आपले काम करण्यासाठी आलो आहोत. आपण निश्चितच विजयाचे हक्कदार आहोत, असे मी खेळाडूंना सांगितले होते. माझ्या संघातील खेळाडूंनी विजय मिळवून माझे बोलणे खरे करून दाखवले.-ख्रिस कोलमन, मॅनेजर वेल्सआमच्या संघाने अनेक चांगल्या संधी गमावल्या. आम्हाला या स्पर्धेत दुखापती आणि निलंबनामुळे चांगल्या खेळाडूंना खेळवता आले नाही. अनुभवी जॉन वेर्टोंघन आणि थॉमस वर्मालेन यांच्यासारखे खेळाडू बेंचवर बसून होते. त्याचा फटका आम्हाला बसला.-मार्क विल्मोटस, मॅनेजर, बेल्जियम.