शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

इतिहासाचे आकडे भारताच्या बाजूने

By admin | Published: February 09, 2017 2:28 AM

भारतीय संघ आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध ८ कसोटी सामने आणि पाच कसोटी मालिका खेळला आहे.

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - गुरुवारचा दिवस क्रिकेटमधील एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. त्याला कारणही तसेच आहे, कसोटी संघाचा दर्जा लाभलेला क्रिकेटमधील दहावा संघ असलेला बांगलादेश आजपासून सुरू होत असलेल्या हैदराबाद कसोटीमधून भारतीय भूमीवरील आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. क्रिकेटमध्ये अजूनही दुस-या फळीतील संघात गणल्या जाणा-या बांगलादेशने बीसीसीआय आणि जगमोहन दालमियांच्या कृपाप्रसादाने १६ वर्षापूर्वीच कसोटी दर्जा मिळवला होता. पण भारताविरुद्धच्या लढतीनेच कसोटी क्रिकेटमधील वाटचालीची सुरुवात करणा-या बांगलादेशला भारतात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळायला मात्र १६ वर्षे जावी लागली. मात्र भारतीय संघ बांगलादेशमध्ये जाऊन पाच कसोटी मालिका खेळलाय.इतिहासाचा मागोवा घेतल्यास कसोटी क्रिकेटमध्ये भारताने बांगलादेशवर नेहमीच हुकूमत राखल्याचे दिसून येते. भारतीय संघ आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध ८ कसोटी सामने आणि पाच कसोटी मालिका खेळला आहे. त्यापैकी सहा कसोटी आणि चार मालिकांमध्ये भारताने विजय मिळवलाय.

भारत बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी मालिका २००० साली खेळला होता. कसोटी दर्जा मिळाल्यानंतरचा बांगलादेशचा तो पहिलाच सामना होता. १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान ढाक्यातील वंगबंधू नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या त्या सामन्यात सुनील जोशीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशला ९ गडी राखून मात दिली होती. उल्लेखनीय म्हणजे भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीचा हा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता.

२००४ साली भारतीय संघ दुस-यांदा बांगलादेश दौ-यावर गेला. त्या दौ-यातही गांगुलीकडेच संघाचे नेतृत्व होते. या मालिकेतही भारताने २-० अशा फरकाने विजय मिळवत बांगलादेशवर निर्विवाद वर्चस्व राखले होते. त्यावेळच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी सचिन तेंडुलकरच्या विक्रमी शतकाने गाजली होती. सचिनने त्या सामन्यात द्विशतक फटकावताना सुनील गावसकरांच्या ३४ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. तसेच त्या सामन्यातील नाबाद २४८ ही त्याची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. सचिनची विक्रमी खेळी आणि इरफान पठाणच्या ११ बळींच्या जोरावर भारताने तो सामना डावाने जिंकला होता. त्या मालिकेतील दुस-या कसोटीत राहुल द्रविडच्या शतकाच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभी केली होती. पण मोहम्मद अश्रफूलने घणाघाती शतक फटकावत भारतीय संघाच्या तोंडचे पाणी पळवले होते. अशावेळी तेव्हाचा उगवता गोलंदाज इरफान पठाणने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने ती कसोटी जिंकली.  

त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौ-यावर गेला तो २००७ साली. त्या दौ-याआधी झालेल्या विश्वचषकात भारताला बांगलादेशकडून धक्कादायकरित्या पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या या बांगलादेश दौ-याकडे क्रिकेट जगताचे विशेष लक्ष लागले होते. त्यावेळी खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिली होती. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या शतकांनी भारताचा पहिला डाव गाजवला होता. पण दुस-या डावात बांगलादेशी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना घाम फोडला होता. दुस-या कसोटीत मात्र भारतीय फलंदाजांनी बांगलादेशची यथेच्छ पिटाई केली. दिनेश कार्तिक, वासिम जाफर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर अशा चार फलंदाजांनी फटकावलेल्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने ही कसोटी डावाने जिंकत मालिकेवर १-० ने कब्जा केला.

२०१० च्या दौ-यात मात्र बांगलादेशने भारताला कडवी झुंज दिली होती. त्या दौ-यातील दोन कसोटी सामन्यांत अनुक्रमे वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनीने संघाचे नेतृत्व केले होते. पैकी पहिल्या कसोटीत सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरच्या शतकांच्या जोरावर भारताने पहिली कसोटी ११३ धावांनी जिंकली. तर दुस-या कसोटीत पुन्हा एकदा सचिन आणि राहुल द्रविडच्या शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशवर दहा गडी राखून मात करत कसोटी मालिका २-० ने खिशात टाकली.त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी २०१५ साली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळला. त्यावेळी संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले. पण पावसाच्या व्यत्ययामुळे ही एकमेव कसोटी अनिर्णित राहिली. शिखर धवनने केलेली १७३ धावांची खेळी या सामन्याचे वैशिष्ट्य ठरली होती.

आता गेल्या वर्ष सव्वा वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड अशा एकापेक्षा एक बलाढ्य संघांना गारद करणा-या आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या भारतीय संघासमोर घरच्या मैदानावर होत असलेल्या एकमेव कसोटीत बांगलादेशचे आव्हान आहे.

गेल्या १८ सामन्यांपासून अपराजित असलेल्या भारताकडे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे फलंदाज आणि आर. अश्विन, रवींद्र जडेजासारखे गोलंदाज आहेत. कुठल्याही संघाला हादरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे आधीचा इतिहास आणि सध्याची भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतासाठी बांगलादेशचे आव्हान परतवून लावणे फारसे जड जाणार नाही. मात्र बांगलादेशकडेही शकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, तमीम इक्बाल, तस्किन अहमदसारखे खेळाडू आहेत. तसेच एखाद्या लढतीत अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमताही या संघाकडे आहे. त्यामुळे भारतीय संघाला या कसोटीत थोडे सावध राहावे लागेल.