शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

आयपीएलमध्ये निचांकी धावसंख्येचा इतिहास

By admin | Published: April 24, 2017 12:31 AM

ईडन्स गार्डनवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगलुरूने आपल्या नावावर निचांकी विक्रमाची नोंद

आकाश नेवे / ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 24 - ईडन्स गार्डनवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगलुरूने आपल्या नावावर निचांकी विक्रमाची नोंद केली. विराट आणि कंपनीने केकेआर विरोधात फक्त ४९ धावा केल्या. केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर आरसीबीच्या फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून परतले.विस्फोटक ख्रिस गेल, रन मशिन विराट कोहली, धडाकेबाज एबीडी, फटकेबाजीत धुरंधर असलेला केदार जाधव असे सरस फलंदाज असलेल्या रॉयल चँलेजर्स बंगलुरू संघाने आयपीएलच्या दहाही पर्वातील सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवली. आरसीबीच्या एकाही फलंदाजात दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर पुर्ण संघाला १० षटकेही खेळून काढता आली नाही. पूर्ण संघ फक्त ५८ धावात बाद झाला. चौथ्या आणि सहाव्या षटकाचा अपवाद सोडला तर प्रत्येक षटकांत आरसीबीने गडी गमावला आहे. आरसीबीच्या या पतनाची सुरूवातच झाली ती विराट कोहलीपासून. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर कोहली बाद झाला. त्यानंतर मनदीप सिंहला बढती देण्याचा निर्णय पुन्हा एकदा अपयशी ठरला. जखमेनंतर पुनरागमन करणारा डिव्हिलियर्सही तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावली.

श्रीनाथ अरविंद याने नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर व्होक्सला एक चौकार लगावला. मात्र हा चौकार गेला कसा हे त्याला देखील कळले नाही. आरसीबीच्या एकाही फलंदाजांच्या खेळी आत्मविश्वास जाणवून येत नव्हता. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलंडता आली नाही. तीन फलंदाज तर शुन्यावर बाद झाले. केदार जाधव याने सर्वाधिक ९ धावा केल्या. केकेआरच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रशिक्षक जॅक कॅलीस यांचा विश्वास सार्थ ठरवला. कुल्टर - नाईल, व्होक्स, डी - ग्रॅण्डहोम या तिकडीने आरसीबीच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावु दिले नाही. गौतम गंभीरच्या आक्रमक नेतृत्वाने हा सामना जिंकला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याने आक्रमक क्षेत्ररक्षण लावले. मागच्या गेल्या काही सामन्यांपासून क्षेत्ररक्षणात केलेले बदल केकेआरसाठी फायदेशीर ठरले आहेत. इडन्सच्या खेळपट्टीशी चांगला परिचित असलेल्या गंभीरने या सामन्यात चार जलदगती गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतला. तो चांगलाच फायदेशीर ठरला. त्याने या सामन्यात एकाही फिरकीपटूला गोलंदाजी दिली नाही. आरसीबीच्या फिरकीने केकेआरला गोत्यात आणल्यावरही त्याने फिरकीपटूला गोलंदाजी देण्याचा मोह टाळला. आरसीबीने नोंदवलेली ४९ ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. याबाबतीत त्यांनी २००९ चा राजस्थान रॉयल्सचा विक्रम मोडला. राजस्थानने त्या सामन्यात आरसीबी विरोधात ५८ धावा केल्या होत्या.निचांकी धावसंख्या नोंदवणारे दहा संघ-

-आरसीबी - ९.५ षटकांत ४९ विरुद्ध केकेआर, आयपीएल २०१७-राजस्थान रॉयल्स १५.१ षटकांत ५८  विरुद्ध आरसीबी आयपीएल २००९-मुंबई इंडियन्स १५.२ षटकांत ६७ विरुद्ध केकेआर आयपीएल २००८-आरसीबी १५ षटकांत ७०विरुद्ध राजस्थान रॉयल्स आयपीएल २०१४-कोची टस्कर्स केरला १६.३ षटकांत ७४ विरुद्ध डेक्कन चाजर्स आयपीएल २०११