हॉकीपटू रितू निवृत्त
By admin | Published: September 22, 2016 1:16 AM
नवी दिल्ली: हेकेखोर वागणुकीचा ठपका ठेवून रिओ ऑलिम्पिकला गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघातून वगळण्यात आलेली नाराज खेळाडू रितू राणी हिने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून बुधवारी निवृत्ती जाहीर केली.
नवी दिल्ली: हेकेखोर वागणुकीचा ठपका ठेवून रिओ ऑलिम्पिकला गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघातून वगळण्यात आलेली नाराज खेळाडू रितू राणी हिने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून बुधवारी निवृत्ती जाहीर केली. रविवारपासून भोपाळ येथे सुरू होत असलेल्या २९ खेळाडूंच्या संभाव्य राष्ट्रीय शिबिरासाठी रितूचे नाव संघात होते. मी शिबिरात दाखल होऊ शकणार नसल्याचे सांगून २४ वर्षांच्या मिडफिल्डर रितूने स्वत:चे करिअर संपविण्याचा निर्णय घेतला. हॉकी इंडियाला दोन दिवसांआधी रितूचा मेल मिळाल्याची माहिती अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली. रितूच्या नेतृत्वात ३६ वर्षानंतर भारतीय संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. रितूने पतियाळाचा पंजाबी गायक हर्ष शर्मा याच्यासोबत १८ ऑगस्ट रोजी विवाह केला. (वृत्तसंस्था)