शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

हॉकी वर्ल्ड लीग - कॅनडाचा भारतावर विजय

By admin | Published: June 25, 2017 7:26 PM

हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 25 - हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत कॅनडाने भारतावर 3-2 अशा फरकाने मात केली आहे. या विजयामुळे कॅनडाने या स्पर्धेत ५ वा क्रमांक पटकावला असून भारताला ६ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकचा 6-1 असा धुव्वा उडवला होता त्यामुळे अखेरच्या सामन्यात कॅनडावर मात करेल असे वाटले होते. मात्र कॅनडाने भारतावर 3-2 अशा फरकाने सहज पराभव केला. सामन्याच्या तिसऱ्या मिनीटाला कॅनाडाच्या जॉन्सनने गोल करत आघाडी घेतली होती. पण भारताच्या हरमनप्रीतने सातव्या आणि 22 व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भराताला सामन्यात आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीतने 3-1 अशी मिळवून दिलेली आघाडी भारतीय संघाला शेवटपर्यंत टिकवता आली नाही. कॅनडाच्या खेळाडूंनी भारतापेक्षा सरस खेळ करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. पाकिस्तान विरोधात गोलचा पाऊस पाडणारा भारतीय संघ कॅनडाविरोधात झुंजताना दिसला. हरमनप्रीतचा अपवाद वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला गोल करता आला नाही.कॅनडाच्या संघाने मात्र मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. 2-1 अशा पिछडीवर असताना त्यांनी 40 व्या मिनीटाला गोल करत बरोबरी साधली. यानंतर जॉन्सनने आक्रमक खेळ करत 44 व्य मिनीटाला झाडत कॅनडाला 3-1 ने आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सत्रात भारताला सामन्यात बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती, मात्र पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात हरमनप्रीतला अपयश आलं.