शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

को‘होली’ है !

By admin | Published: March 20, 2016 4:34 AM

कोणत्याच वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात न जिंकू शकणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकवर ६ गडी

पाकिस्तानचा धुव्वा : भारताचा सहा गड्यांनी विजयकोलकाता : कोणत्याच वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात न जिंकू शकणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकवर ६ गडी राखून विजय मिळविला.ऐतिहासिक ईडन गार्डनवर दिग्गजांच्या उपस्थितीत सायंकाळी हजारो चाहत्यांच्या साक्षीने रंगलेल्या प्रत्येकी १८ षटकांच्या हायव्होल्टेज लढतीत भारतीय फलंदाजांनी सामना एकतर्फी ठरविला. नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षण घेतले. पाकला १८ षटकांत ५ बाद ११८ धावांत रोखल्यानंतर भारताने १५.५ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावा करीत सामना जिंकला. विराट कोहलीने ३७ चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावा ठोकल्या. कर्णधार धोनी १३ धावांवर नाबाद राहिला. सुरुवातीला झालेली पडझड युवराज- विराट कोहली यांनी थोपविली. या दोघांनी ७.२ षटकांत चौथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी करीत संघाला विजयी पथावर आणले. या मैदानावर भारताने पाकचा टी-२० त पराभव केला नव्हता. आज ही परंपरा मोडित निघाली. अमिताभचे राष्ट्रगीत...सुरुवातीला महानायक अमिताभ बच्चन यांनी हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने भारताचे तसेच पाकचा गायक शफाकत अमानत याने पाकचे राष्ट्रगीत गायले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विशेष उपस्थिती होती. अमिताभ यांनी आमंत्रणाबद्दल सौरव गांगुलीचे आभार मानून भारत- पाकमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याबद्दल शुभेच्छाही दिल्या.दिग्गजांचा गौरव...क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या आठ माजी दिग्गजांचा बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे मुख्यमंत्री ममतादीदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, पाकचे इंतिखाब आलम, इम्रान खान, वकार युनूस, वसीम अक्रम यांच्यासह माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा देखील कॅबद्वारे विशेष सन्मान करण्यात आला. पंतप्रधानांकडून कौतुक...भारतीय संघाच्या विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. देशभरात विजयाची होळी!भारताच्या विजयाचा आनंद देशभरात होलिकोत्सवाच्या रुपाने साजरा करण्यात आला. क्रिकेट चाहत्यांसोबत सामान्य नागरिकांनी भारताचा विजय साजरा होताच फटाके फोडून, तिरगा फडकवित आणि गुलला उधळून जल्लोष केला. मुंबईकरांनी केला विराट विजयोत्सव...भारताने कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवताच मुंबईकरांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली. नाक्यानाक्यावर आणि चौकात फटाके वाजवून मुंबईकरांनी हा विजयोत्सव साजरा केला तसेच मिठाईही वाटून आनंद द्विगुणित केला. शनिवारचा दिवस क्रिकेटप्रेमींनी भारत-पाकिस्तानसाठी खास राखून ठेवला होता. विविध ठिकाणी मोठ्या स्क्रिनवर सामन्याच्या थेट प्रक्षेपणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सोशल मीडियामध्येही मॅचसंबंधी चर्चेला उधाण आले होते. 1,200कोटींचा सट्टामुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला असतानाच बुकींनी या सामान्यासाठी तब्बल १ हजार २०० कोटींचा सट्टा लावला होता. कोण जिंकणार? या उत्सुकतेपोटी प्रत्येकाचे श्वास रोखले गेले असतानाच दुसरीकडे जोरदार सट्टाही लावला जात होता. सामना सुरू असताना पहिल्या डावावेळी भारतासाठी १ रुपयाला ७० पैसे असा भाव होता. तर पाकिस्तानसाठी १ रुपयाला अडीच रुपये असा भाव होता. भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर दोन गडी बाद झाले असता सट्ट्याच्या दरात बदल झाले. आणि हा भाव १ रुपयांसाठी ९५ पैसे एवढा झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.