शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

मानधनाचा शतकी तडाखा

By admin | Published: June 30, 2017 12:58 AM

फिरकी गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर मराठमोळ्या स्मृती मानधनाने केलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषक स्पर्धेत

टाँटन : फिरकी गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर मराठमोळ्या स्मृती मानधनाने केलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना टी२० जगज्जेत्या वेस्ट इंडीजचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. विंडीजला निर्धारीत ५० षटकात ८ बाद १८३ धावांवर रोखल्यानंतर भारताने ४२.३ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले. दरम्यान, कर्णधार मिताली राज (४६) सलग ८ डावांमध्ये अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमापासून अवघ्या ४ धावांनी दूर राहिली.धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर पूनम राऊत (०) व दीप्ती शर्मा (६) स्वस्तात परतल्याने भारताची आठव्या षटकात २ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली होती. मात्र, मानधनाने सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना मितालीसह तिसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची निर्णायक भागीदारी केली. या दोघींनी विंडीजची जबरदस्त धुलाई केली. मितालीने फॉर्ममध्ये असलेल्या मानधनाला जास्तीत जास्त स्ट्राइक दिली. मिताली ८८ चेंडूत ३ चौकारांसह ४६ धावांवर बाद झाली. मानधनाने १०८ चेंडूत १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०६ धावा फटकावल्या. तत्पूर्वी, काऊंटी मैदानावर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतीयांनी विंडीजची कोंडी केली.एकवेळ विंडीज दिडशेचा टप्पा पार करेल की नाही अशी शंका होती. मात्र, शानेल डेली (३७ चेंडूत ३३ धावा) व अफी फ्लेचर (२३ चेंडूत नाबाद ३६ धावा) या तळाच्या फलंदाजांनी विंडीजला सावरले. या दोघींमुळे विंडीजने ६ बाद ९१ अशा परिस्थितीतून समाधानकारक मजल मारली. याशिवाय, सलामीवीर हायली मॅथ्यूजने (५७ चेंडूत ४३) चांगली फलंदाजी केली. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरल्याने विंडीजचा डाव घसरला. लेग स्पिनर पूनम यादव, आॅफ स्पिनर दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी २ महत्त्वपूर्ण बळी घेत विंडीज फलंदाजीला खिंडार पाडले. एकता बिष्टने एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :-वेस्ट इंडीज : हायले मॅथ्यूज झे. व गो. शर्मा ४३, स्टेफनी टेलर धावबाद (मंधना) १६, शनेल डेली यष्टीचीत वर्मा गो. शर्मा ३३, अफी फ्लेचर नाबाद ३६, अनिसा मोहम्मद नाबाद ११. एकूण : ५० षटकात ८ बाद १८३ धावा. गोलंदाजी : एकता बिष्ट १०-२-२३-१; दीप्ती शर्मा १०-१-२७-२; पूनम यादव १०-२-१९-२; हरमनप्रीत कौर ७-०-४२-२.भारत : पूनम राऊत झे. अग्युल्लेरिया गो. कॉन्नेल ०, स्मृती मानधना नाबाद १०६, दीप्ती शर्मा त्रि. गो. ६. मिताली राज झे. फ्लेचर गो. मॅथ्यूज ४६, मोना मेश्राम नाबाद १८. एकूण : ४२.३ षटकात ३ बाद १८६ धावा. गोलंदाजी : शामिलिया कॉन्नेल ४-०-२३-१; स्टेफनी टेलर १०-१-२४-१; हायली मॅथ्यूज ८.३-०-३५-१.