शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
2
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
3
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
4
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
5
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
6
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
7
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
8
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
9
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
10
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
11
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
12
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
13
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
14
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
15
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
16
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
17
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
18
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
19
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
20
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

अफगाणिस्तानच्या आशा जिवंत

By admin | Published: March 11, 2016 3:43 AM

मोहम्मद नबीची सुरेख फिरकी गोलंदाजी आणि मोहम्मद शेहजाद याची शानदार खेळी या बळावर अफगाणिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरी सामन्यात हाँगकाँगचा ६ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला

जयंत कुलकर्णी,  नागपूरमोहम्मद नबीची सुरेख फिरकी गोलंदाजी आणि मोहम्मद शेहजाद याची शानदार खेळी या बळावर अफगाणिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरी सामन्यात हाँगकाँगचा ६ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. या विजयाबरोबरच क्रिकेटमध्ये आपली नवीन ओळख करू पाहणाऱ्या अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडचा गुरुवारी पराभव करणाऱ्या झिम्बाब्वे या दोन संघांत विश्वचषक ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेतील पात्र ठरण्यासाठी चुरस असणार आहे. हाँगकाँगने विजयासाठी दिलेले ११७ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने १८ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून मोहम्मद शेहजाद याने ४0 चेंडूंत २ षटकार व ४ चौकारांसह ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. नूर अली जरदान याने ३७ चेंडूंत ३५ धावा केल्या. हाँगकाँगकडून कॅम्पबेलने २ गडी बाद केले.विजयाचा पाठलाग करताना मोहम्मद शेहजाद आणि नूर अली जरदान यांनी अफगाणिस्तान संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्यांच्या तडाख्यामुळे अफगाणिस्तानने त्यांचे अर्धशतक ४0 चेंडूंत धावफलकावर लगावले. या दोघांनी गोलंदाजांना लयच मिळू दिली नाही. विशेषत: मोहम्मद शेहजाद याने नदीम अहमद याला मिडविकेट, तर अंशुमन रथ याला लाँगआॅनवर सणसणीत षटकार ठोकताना त्यांचा समाचार घेतला. शेहजाद व नूर अली यांनी ६४ चेंडूंत ७0 धावांची सलामी देताना अफगाणिस्तानच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. कॅम्पबेलला उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात अखेर मोहम्मद शेहजाद अंशुमन रथच्या हाती लाँगआॅफला झेल देऊन परतला. त्यानंतर आठ धावांच्या अंतरातच हाँगकाँगच्या गोलंदाजांनी जम बसलेल्या नूर अली जरदानसह मोहमद नबी (१७) आणि शफीकउल्लाह यांना (0३) तंबूत धाडताना १ बाद ९५ वरून त्यांची ४ बाद १0३ अशी स्थिती करताना सामन्यात चुरस वाढवली; परंतु नजीबबुलाह जरदान याने हसीब अमजदला एकाच षटकात ३ चौकार मारताना अफगाणिस्तान संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, आॅफस्पिनर मोहम्मद नबी याच्या सुरेख फिरकी गोलंदाजीच्या बळावर अफगाणिस्तान संघाने २0 षटकांत ६ बाद ११६ धावांवर रोखले.विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियम येथील लढतीमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी हाँगकाँगला डोके वर काढण्याची उसंतच दिली नाही. हाँगकाँगकडून अंशुमन रथने ३१ चेंडंूत चौकारासह २८ धावा केल्या. रेयॉन कॅम्पबेलने २४ चेंडूंत ५ चौकारांसह २७ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी याने २0 धावांत ४ गडी बाद केले. त्याला राशीद खान आणि गुलबदिन नईब यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. हाँगकाँगने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांना दौलत झरदानला दोन चौकार मारणाऱ्या रेयन कॅम्पबेल याने जॅमी अ‍ॅटकिन्सन याच्या साथीने ५.४ षटकांत ४0 धावांची सलामी दिली; परंतु अफगाणिस्तान मोहम्मद नबी, राशीद खान व गुलाबदिन या त्रिकुटाने पुढील २२ धावांत ४ फलंदाजांना तंबूत धडताना हाँगकाँगची बिनबाद ४0 वरून ४ बाद ६२ अशी स्थिती केली. या स्थितीतून हाँगकाँग संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. मोहम्मद नबी याने सर्वांत प्रथम त्याच्या पहिल्याच षटकात जम बसलेला रेयान कॅम्पबेल त्रिफळाबाद करीत आणि नंतर बाबर हयात याला समीउल्लाह शेनवारी याच्या हाती झेल देण्यास भाग पाडताना हाँगकाँगला दुहेरी धक्का दिला. त्यानंतर समीउल्लाह शेनवारीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक शेहजादकडून जीवदान मिळाल्याचा फायदाही अ‍ॅटकिन्सन याला घेता आला नाही आणि तो रशीद खानच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. संक्षिप्त धावफलक :हाँगकाँग : २0 षटकांत ६ बाद ११६. (अंशुमन रथ २८, रेयॉन कॅम्पबेल २७, मोहम्मद नबी ४/२0, राशीद खान १/२३, गुलबदिन नईब १/१३).अफगाणिस्तान : १८ षटकात ४ बाद ११९. (मोहमद शेहजाद ४१, नूर अली जरदान ३५, मोहमद नबी १७, एन. जरदान नाबाद १७. रेयॉन कॅम्पबेल २/२८).