Chess robot grabs and breaks seven-year-old boy’s finger : रुसमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. लहान मुलांसाठी या स्पर्धेचं आयोजन केले गेले होते आणि या दरम्यान एका रोबोटने ७ वर्षांच्या मुलाला जखमी केले. हा मुलगा जेव्हा त्याची चाल चालवत होता, तेव्हा रोबोट सक्रिय झाला आणि त्या मुलाचं बोट त्यानं तोडलं.
ABC न्यूजच्या रिपोर्ट नुसार १९ जुलैला मॉक्सो येथील मॉक्सो चेस ओपन स्पर्धेतील ही घटना आहे. या स्पर्धेत बरेच खेळाडू रोबोटसह बुद्धीबळ खेळत होते. याच दरम्यान एका पटावर रोबोटने ७ वर्षांच्या मुलाचे बोट पकडले आणि ते जोरात दाबले. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे. ज्यात रोबोटने बोट तोडल्यानंतर तो मुलगा असह्य वेदनेसह रडताना दिसतोय. जवळपास उपस्थित असलेले काही जणं त्या मुलाची सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले आहे.