शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

यजमान इंग्लंडची विजयी सलामी

By admin | Published: June 02, 2017 1:06 AM

बांगलादेशने दिलेले ३०६ धावांचे आव्हान सहजपणे पार करताना यजमान इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दिमाखदार विजयी सलामी

लंडन : बांगलादेशने दिलेले ३०६ धावांचे आव्हान सहजपणे पार करताना यजमान इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दिमाखदार विजयी सलामी देत विजयी २ गुण मिळवले. जो रुटने तडाखेबंद नाबाद १३३ धावांची खेळी करत इंग्लंडच्या विजयाचा ‘रुट’ आखला. त्याचप्रमाणे कर्णधार इआॅन मॉर्गननेही त्याला उत्तम साथ देताना नाबाद ७५ धावांची खेळी करत मोलाचे योगदान दिले. इंग्लंडने ४७.२ षटकात २ बाद ३०८ धावा करुन बांगलादेशचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला.ओव्हल मैदानावर इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. मशरफी मोर्ताझाने सलामीवीर जेसन रॉयला (१) झटपट बाद करत इंग्लंडला धक्का दिला. मात्र अ‍ॅलेक्स हेल्स आणि रुट यांनी १५९ धावांची भागीदारी करुन बांगलादेशची हवा काढली. हेल्सने आक्रमक पवित्रा घेत प्रत्येक गोलंदाजाला चोपले. हेल्सचे शतक अवघ्या ५ धावांनी हुकले. शब्बीर रहमानने त्याला बाद केले. हेल्सने ८६ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांसह ९५ धावांचा तडाखा दिला. यानंतर रुट - मॉर्गन यांनी नाबाद १४३ धावांची भागीदारी करुन इंग्लंडला विजयी केले. तत्पूर्वी, सलामीवीर तमिम इक्बालच्या (१२८) शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात ६ बाद ३०५ धावांची आव्हानात्मक मजल मारली. मुशफिकर रहीमनेही (७९) शानदार अर्धशतक झळकावून इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच पळवले. तमिमने कारकिर्दितील नववे शतक झळकावताना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीही केली. त्याने १४२ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार ठोकताना १२८ धावांची दमदार खेळी केली. सरकार (२८) आणि इम्रुल कायेस (१९) फारशी चमक न दाखवता बाद झाल्यानंतर तमिम - रहिम यांनी सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. तमिमने चौफेर फटकेबाजी करताना इंग्लिश गोलंदाजांची लय बिघडवली. दुसरीकडे, रहिमने रहिमने ७२ चेंडूत ८ चौकारांसह ७९ धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे बांगलादेशची तिनशे धावांच्या दिशेने वाटचाल झाली. इंग्लंडकडून प्लंकेटने ५९ धावांमध्ये ४ बळी घेत बांगलादेशला रोखण्याचा प्रयत्न केला. जॅक बॉल आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला. दरम्यान, आयपीएल गाजवलेल्या स्टोक्सला गोलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवता आली नाही. (वृत्तसंस्था)धावफलक बांगलादेश : तमिम इक्बाल झे. बटलर गो. प्लंकेट १२८, सौम्य सरकार झे. बेरस्टो गो. स्टोक्स २८, इम्रुल कायेस झे. वूड गो. प्लंकेट १९, मुशफिकर रहिम झे. हेल्स गो. प्लंकेट ७९, शाकिब अल हसन झे. स्टोक्स गो. बॉल १०, शब्बीर रहमान झे. रॉय गो. प्लंकेट २४, महमुद्दुलाह नाबाद ६, मोसद्दक हुसैन नाबाद २. अवांतर - ९. एकूण : ५० षटकात ६ बाद ३०५ धावा. गोलंदाजी : ख्रिस वोक्स २-१-४-०; मार्क वूड १०-१-५८-०; जॅक बॉल १०-१-८२-१; बेन स्टोक्स ७-०-४२-१; लायम प्लंकेट १०-०-५९-४; मोइन अली ८-१-४०-०; जो रुट ३-०-१८-०.इंग्लंड : जेसन रॉय झे. रहमान गो. मोर्तझा १, अ‍ॅलेक्स हेल्स झे. सुंझामुल इस्लाम गो. शब्बीर ९५, जो रुट नाबाद १३३, इआॅन मॉर्गन नाबाद ७५. अवांतर - ४. एकूण : ४७.२ षटकात २ बाद ३०८ धावा. गोलंदाजी : मशरफी मोर्तझा १०-०-५६-१; शाकिब अल हसन ८-०-६२-०; मुस्तफिझुर रहमान ९-०-५१-०; सौम्य सरकार २-०-१३-०; मोसद्दक हुसैन ७.२-०-४७-०; रुबेल हुसैन १०-०-६४-०; शब्बीर रहमान १-०-१३-०.