India performance in Paris Olympics 2024 :पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता आज ११ ऑगस्टला होणार आहे. पण अखेरच्या दिवशी भारताच्या एकाही खेळाडूचा इवेंट नाही. महिला कुस्तीपटू रीतिका हुड्डा ही या स्पर्धत भारताकडून खेळणारी शेवटची स्पर्धक ठरली. ७६ किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल कुस्ती क्रीडा प्रकारात तिने पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण इथंही निराशाच पदरी आली. टोकियोच्या तुलनेत यंदा कामगिरी सुधारेल अशी अपेक्षा होती पण तसं झाले नाही. जाणून घेऊयात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंची कामिगिरी कशी राहिली.
या स्टार खेळाडूंच्या पदरी आली निराशा
भारताकडून 117 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले होते. जगातील मानाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू दुहेरी आकडा गाठतील अशी आशा होती. पण टोकियोच्या तुलनेत यावेळी एक पदक कमीच आले. ज्या खेळाडूंकडून पदकाची हमी होती, त्या खेळाडूंनी सोन्यासारखा खेळ खेला. पण पदक काही त्यांच्या हाती लागलेच नाही. यात पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लक्ष्य सेन आणि तिरंदाजीत दीपिका कुमारी यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.जे पदकाच्या उंबरठ्यापर्यंत पोहचले, पण त्यांची झोळी रिकामीच राहिली.
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी (० सुवर्ण, १ रोप्य आणि 4 कांस्य)
वेगवेगळ्या स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली क्षमता दाखवून दिली आहे. पण बहुतांश वेळा ऑलिम्पिकमध्ये या क्रीडा प्रकारातून भारताच्या पदरी निराशा पडली होती. पण यावेळी चौघांनी मिळून भारताच्या खात्यात 3 पदकाची कमाई करून दिली.3 कांस्य पदकासह या खेळातून भारताला सर्वाधिक पदकं आली. याशिवाय कुस्तीमध्ये एक कांस्य, भालाफेकमध्ये रौप्य आणि हॉकी संघाने आपली कामगिरी कायम ठेवत यावेळी सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेत भारताला एकही सुवर्ण पदक मिळाले नाही. विनेश फोगाट प्रकरणातील निर्णय भारताच्या बाजूनं लागला तर आणखी एक पदक निश्चित होईल. पण एकही सुवर्ण पदक नसल्यामुळे क्रमवारीत फारसा बदल होणार नाही.
टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी यावेळी पेक्षा होती उत्तम (१ सुवर्ण, २ रौप्य आणि 4 कांस्य)
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 124 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदकाची कमाई करून दिली होती. याशिवाय कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमध्ये 2 रौप्य आणि बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती आणि हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली होती.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेते
मीराबाई चानू, वेटलिफ्टिंग- रौप्यलवलिना बोरगोहेन, बॉकिंग्स- कांस्यपीव्ही सिंधू, बॅडमिंटन- कांस्यरवी कुमार दहिया, कुस्ती- रौप्यपुरुष हॉकी संघ- कांस्यबजरंग पूनिया, कुस्ती- कांस्यनीरज चोप्रा, भालाफेक- सुवर्ण
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत पदकतालिकेत आघाडीच्या ५० देशांमध्ये होता. यावेळी भारताचे स्थान सत्तरीपार आहे.