ब्रिस्बेन : सहयजमान आॅस्ट्रेलियाची बांगलादेशविरुद्ध ब्रिस्बेन येथे शनिवारी लढत होत असून, अ गटाच्या या सामन्यावर चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. मार्सिया नावाचे हे चक्रीवादळ शुक्रवारी क्वीन्सलॅण्डच्या सागरी किनाऱ्यावर धडकले. त्यामुळे दोन्ही संघांनी इन्डोअर सराव केला. सामना ५०-५० षटकांचा होण्याची शक्यता क्षीण आहे. बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझा म्हणाला, ‘सामना खेळला जाण्याची शक्यता कमी असली तरी आम्ही कसून सराव केला. सामन्यात गुणविभागणी झाल्यास आम्हाला लाभ होईल, हा विचार सध्यातरी डोक्यात नाही. हा नकारात्मक विचार असला तरी गुणविभागणी होणे तोट्याचे नाहीच.’आॅस्ट्रेलियाचा या सामन्यात विजय होऊ शकतो; पण वादळ त्यांच्यासाठी खलनायक ठरण्याची शक्यता आहे. ब्रिस्बेनमध्ये पाऊस झाल्यामुळे आधीच या सामन्यावर संशयाचे ढग निर्माण झाले. पावसामुळे आधीच फुटबॉल आणि रग्बी सामनादेखील रद्द करण्यात आला आहे. या सामन्याद्वारे कर्णधार मायकेल क्लार्क याला संघात पुनरागमन करायचे आहे; पण त्यासाठी त्याला फिटनेस सिद्ध करावे लागेल. पण क्लार्कचे लक्ष क्वीन्सलॅन्डच्या जनतेकडे आहे. मार्सिया वादळाने लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लोकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने आम्ही सर्व खेळाडू प्रार्थना करू, असे क्लार्क म्हणाला. प्रार्थनेनंतरच आम्ही उद्याच्या सामन्याची चिंता करू. या सामन्यासाठी आॅस्ट्रेलियाने गुरुवारी अंतिम एकादशची घोषणादेखील केली. क्लार्क संघात आला तर मागच्या सामन्यात नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज बेलीला बाहेर बसावे लागेल. याशिवाय हेजलवूडचे स्थान पॅट कमिन्स याने घेतले आहे. विश्वचषकाच्या स्थानिक आयोजन समितीने या सामन्याबद्दल चिंता व्यक्त केली. साखळी सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. आयसीसीचे सामनाधिकारी उद्या हवामान आणि मैदानाच्या स्थितीचे अवलोकन केल्यानंतर सामना खेळविण्याचा निर्णय घेणार आहेत.(वृत्तसंस्था)हेड टू हेड४आॅस्ट्रेलिया आणि बांगला देश हे दोन्ही संघ १९ वेळा एक दिवसीय लढतींमध्ये एकमेकांविरूद्ध खेळले आहेत. आॅस्ट्रेलियाने १८ वेळा विजय नोंदविला आहे तर बांगला देशने एक वेळा आॅस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. ४विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ दोन वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत. या दोन्ही लढतीत आॅस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. ४ आॅस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), जोश हेजलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसन.४ बांगलादेश : मशरफे मोर्ताझा (कर्णधार), अल आमीन हुसेन, अनामुल हक, अराफत सन्नी, महमुदुल्लाह, मोमिनुल हक, मुशफिकर रहिम (यष्टीरक्षक), नासीर हुसेन, रुबेल हुसेन, सब्बीर रहमान, शकिब अल हसन, सौम्या सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इकबाल, तस्कीन अहमद
आॅस्ट्रेलिया-बांगला लढतीवर चक्रीवादळाचे सावट
By admin | Published: February 21, 2015 2:29 AM