ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ११ - चेन्नईच्या २१० धावांचा पाठलाग करताना हैदराबादने १४ षटकांत ३ गडी गमावून १०२ धावा केल्या आहेत. वॉर्नर (४२)व बोपारा (७) खेळत असून शिखर धवन (२६), केएल. राहुल (५) तर ओझा १५ धावांवर बाद झाला. चेन्नईतर्फे शर्माने २ तर अश्विनने १ बळी टिपला.
तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेणा-या चेन्नईने ब्रँडन मॅकलमच्या शानदार शतकी (नाबाद १००) खेळीमुळे हैदराबादसमोर जिंकण्यासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईने २० षटकांत ४ गडी गमावून २०९ धावा केल्या.
स्मिथ २७ धावांवर खेळत असताना तर रैना १४ धावांवर असताना दोघेही धावचीत होऊन तंबूत परतले. मात्र मॅकलमने १०० धावांची शानदार खेळी केली, त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनीचीही तितकीच (५३) मोलाची साथ मिळाली. मात्र धोनी बाद झाल्यावर जडेजाही शून्यावरच धावचीत झाला आणि २० षटकांत चेन्नईची धावसंख्या ४ बाद २०९ इतकी झाली.