ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - आयपीएलच्या नवव्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पाच गडी राखून विजय मिऴविला.
किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने १७. ५ षटकात १४६ धावा केल्या. या सामन्यात सलामीवीर जोडीने केलेल्या शानदार खेळीमुळे संघाच्या धावसंख्या मजबूत भर पडली. फलंदाज डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकाच्या जोरावर ३१ चेंडूत तीन षटकार व सात चौकार लगावत ५६ धावां केल्या. तर शिखर धवनने ४४ चेंडूत ४५ धावा कुटल्या. आदित्य तरे अवघ्या शून्य धावेवर बाद झाला. मार्गन २५, हुड्डा ५, हेन्रिक्सने नाबाद ५ आणि ओझाने नाबाद ५ धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कोणताच फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. शॉन मार्शने जास्त धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत ४० धावा केल्या.
पंजाबच्या फलंदाजांना गेल्या काही सामन्यात कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेला किंग्ज इलेव्हन विजय मिळवण्यास उत्सुक होता. मात्र, तो अयशस्वी ठरला.
सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत किंग्ज इलेवन पंजाबच्या मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. मुस्तफीजूर रहमान आणि मोइजेस हेन्रिक्सने प्रत्येकी दोन बळी घेतल्या, तर भुवनेश्वरने एक बळी घेतला.