शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हैदराबादने आरसीबीच्या चाहत्यांना केले निराश

By admin | Published: May 31, 2016 3:37 AM

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर क्रिकेट चाहत्यांचे विशेष प्रेम होते. त्यातील हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित होते

रवी शास्त्री लिहितो़ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर क्रिकेट चाहत्यांचे विशेष प्रेम होते. त्यातील हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित होते, तर लाखो चाहते वेगवेगळ्या ठिकाणांवरून संघाच्या विजयासाठी प्रार्थना करीत होते. आरसीबी संघाचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. हे चाहते हृदयाने आरसीबीसोबत होतेच आणि संघाच्या विजयासाठी ते करुणाही भाकत होते; पण हैदराबाद संघाच्या चमकदार कामगिरीने आरसीबीच्या चाहत्यांना निराश केले. विराट कोहलीला यंदाच्या मोसमात रोखणे जवळजवळ अशक्य ठरले. तो सुपरस्टार्सदरम्यान सुपरस्टार ठरला. त्याची फलंदाजीची लय बघता जीवनात कधीकधीच अशी फलंदाजी बघण्याची संधी मिळते, याची प्रचिती आली. सुरुवातीला बेंगलोर संघासाठी त्यांचे गोलंदाज चिंतेचा विषय ठरत होते, तर फलंदाजी सुरुवातीपासून फॉर्मात होती. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात उभय विभागात सांघिक कामगिरी अनुभवाला मिळाली. त्यामुळे संघाने अखेरच्या आठपैकी सात सामन्यांत विजय मिळवला. अंतिम लढतीतील काही निर्णयावर चर्चा करता येईल. वॉटसनकडून पूर्ण चार षटके गोलंदाजी करण्याऐवजी इक्बाल अब्दुल्लाला गोलंदाजीसाठी पाचारण करता आले असते किंवा सचिन बेबीच्या स्थानी सरफराज अहमदला खेळविता आले असते. हैदराबाद संघाचे यश आत्मविश्वासाची प्रचिती देणारे आहे. गोलंदाजी या संघाची मुख्य ताकद आहे. त्यामुळे फलंदाजीमध्ये संघात एकमेव वॉर्नर फॉर्मात असला तरी त्याचा विशेष फरक पडला नाही. संघाला सुरुवातीपासून तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची चिंता सतावत होती, तर तळाच्या फलंदाजांकडून उपयुक्त साथ लाभत नव्हती. केवळ आत्मविश्वास उंचावलेला असल्यामुळे संघ चॅम्पियन ठरला. गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. जर मुस्तफिजूर आणि भुवनेश्वर फलंदाज असते तर ते कोहलीचे कडवे प्रतिस्पर्धी ठरले असते.स्पर्धेतील अन्य दोन दावेदार संघांनी ही लढत मैदानाबाहेरून बघितली. मुंबई इंडियन्सला गृहमैदान बदलल्याचा फटका बसला तर कोलकाता नाईट रायडर्स संघ युसूफ पठाणवर गरजेपेक्षा अधिक विसंबून असल्याचे दिसून आले. या दोन संघांपैकी एखादा संघ प्लेआॅफमध्ये स्थान मिळवणार नाही, असे अपवादानेच घडले असते. या स्पर्धेत सर्वंच संघांना समान संधी मिळाली. त्यात गुजरात लायन्स संघाने मोसमाच्या सुरुवातीपासून शानदार खेळ केला, तर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने पूर्वीच्या तुलनेत या वेळी शानदार आगेकूच केली. रायझिंग पुणे सुपरजायंट््स व किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठीही या वेळी काही संस्मरणीय बाबी घडल्या. धोनीने ताठ मानेने यंदाच्या आयपीएलचा निरोप घेतला. मुरली विजयला कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागली आणि त्याने आपली भूमिका चोख बजावली.यंदाच्या मोसमात २०० पेक्षा अधिक धावसंख्येचे स्कोअर मोजक्याच लढतींत बघायला मिळाले. षटकारही पूर्वीच्या तुलनेत कमी लगावले गेले. जास्तीत जास्त स्कोअर १६०-१७० च्या दरम्यान झाले. त्यामुळे कोहली आणि वॉर्नरच आपल्याला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरल्याचे दिसून येते. (टीसीएम)