शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी...”: बाळा नांदगावकर
2
समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण?
3
महायुती असो वा मविआ, ५००० पेक्षा कमी मताधिक्य असलेल्या 'या' ३१ जागांवर चुरशीची लढत
4
श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य
5
ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले 
6
"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले
7
"गौतम गंभीरला पत्रकार परिषदेत बसवू नका, त्याचे शब्द..."; भारताच्या माजी क्रिकेटरचा BCCIला सल्ला
8
सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?
9
'घुसखोराने आदिवासी महिलेशी लग्न केले तरी...', झारखंडमध्ये अमित शहांचे मोठे आश्वासन
10
लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन कौशल चौधरीच्या पत्नीला अटक; खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप
11
'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींनी घणाघात
12
...तर पाकिस्तानची टीम चॅम्पिअन्स ट्रॉफीत खेळणार नाही; पाकिस्तान सरकारची तयारी
13
विधानसभा निवडणूक लढवण्यास का दिला नकार?, विनोद तावडेंनी सांगितली सगळी स्टोरी
14
पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना
15
"अचानक घरगडी आणून..."; काँग्रेसमध्ये गेले म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सरवणकारंचे प्रत्युत्तर
16
खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय
17
तुलसी विवाह: तुमची रास कोणती? ‘हे’ उपाय करा, अनेकविध लाभ मिळवा; इच्छापूर्ती अन् फायदा!
18
शेअर बाजार सपाट बंद! एशियन पेंट्ससह दिग्गज कंपन्यांना धक्का; 'या' क्षेत्रात तुफान तेजी
19
भाजपला 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन काय साध्य करायचे आहे? नितीन गडकरी स्पष्टच बोलले
20
Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

हैदराबाद प्लेआॅफसाठी तर मुंबई अव्वल स्थानासाठी लढणार

By admin | Published: May 08, 2017 6:04 PM

पंजाब विरुद्ध गुजरात या सामन्यात गुजरातच्या विजयाचा आनंद रैना पेक्षा हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला कदाचित जास्त झाला

आकाश नेवे/आॅनलाईन लोकमतपंजाब विरुद्ध गुजरात या सामन्यात गुजरातच्या विजयाचा आनंद रैना पेक्षा हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला कदाचित जास्त झाला असेल. पंजाबने या सामन्यात विजय मिळवला असता तर ते प्ले आॅफसाठी कडवी झुंज देऊ शकले असते. मात्र गुजरातने पंजाबच्या अडचणी वाढवल्या आणि हैदराबादच्या काही प्रमाणात कमी केल्या. हैदराबादला प्ले आॅफसाठी आज मुंबई विरोधात विजय नोंदवणे आवश्यक आहे. तर मुंबई इंडियन्सदेखील प्ले आॅफमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर कायम राहण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे ते देखील आज ८ वाजता हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडिअमवर होणाऱ्या यासामन्यात विजयासाठी कसोशीने प्रयत्न करतील. क्वालिफायरसाठी मुंबईला गुणतक्त्यात पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहणे गरजेचे आहे. मुंबईने प्ले आॅफमध्ये प्रवेश केलेला असला तरी त्यांचे लक्ष्य आता क्वालिफायर सामन्यात खेळण्याचे आहे. त्यामुळे मुंबईचा धडाकाहैदराबाद रोखू शकेल का, हा प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सने पुणे वगळता इतर कोणत्याही संघासमोर हार मानलेली नाही. मजबूत फलंदाजी, अष्टपैलुु खेळाडूंचा भरणा, आणि गोलंदाज या तिन्ही प्रकारात मुंबई इंडियन्स सरस आहे. जोश बटलर, पार्थिव पटेल, लेंडल सिमन्स हे संघाला उत्तम सुरूवात करून देतात. मधल्या फळीत रोहित शर्मा, नितीश राणा, पोलार्ड हे दमदार कामगिरी करत आहे. हार्दिक आणि कृणाल पांड्या अखेरच्या षटकांत संघाच्या धावगतीला मोठा वेग मिळवून देतात. तर गोलंदाजीत मिशेल मॅक्लेघन, हरभजन सिंह, कर्ण शर्मा प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत आहेत. मुंबईने या आधीच्या सामन्यात दिल्लीवर विक्रमी १४६ धावांनी विजय मिळवला होता. त्यात हरभजनने ३ आणि कर्ण शर्माने देखील तीन बळी घेतले होते. डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट म्हणून जसप्रीत बुमराह ओळखला जातो. तो अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघाला कशी खिळ घालतो हे सर्वांनीगुजरात विरुद्ध मुंबईच्या सामन्यात पाहिले आहे. सुपर ओव्हरमध्ये त्याने फिंच,मॅक्युलम यांना रोखले होते. हैदराबादचा संघही सरस आहे. डेव्हिड वॉर्नर ५२० धावा करून आॅरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे तर भुवनेश्वर कुमार २१ बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे आहे. वॉर्नर आणि धवन बाद झाल्यावर मधली फळी झटपट धावा करण्यात अपयशी ठरत आहे. युवराज सिंहने आधीच्या सामन्यात दिल्ली विरोधात ७० तर पुण्याविरोधात ४७ धावा फटकावल्या होत्या. मात्र या दोन्ही सामन्यात सनरायजर्सला पराभव स्विकारावा लागला. पुण्याने तर घरच्या मैदानावर हैदराबादला पराभूत केले होते. मात्र मुंबई विरोधातील हा सामना देखील हैदराबादमध्येच होणार आहे. आणि घरच्या मैदानावर सनरायजर्स नेहमीच वरचढ ठरले आहेत.