शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

रोनाल्डोनं केली 'मन की बात'; मीच भारी! असं म्हणत शेअर केली आत्मविश्वास जपण्याची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:08 IST

खेळावरील प्रेम अन् आपल्या कामगिरीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन असावा तर असा

फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो आपला ४० वा वाढदिवस साजरा करतोय. स्टार फुटबॉलरच्या बर्थ डे  सेलिब्रेशनमध्ये चाहत्यांनीही रंग भरल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो. वयाच्या चाळीतही या पठ्ठ्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो. हीच गोष्ट त्याला फुटबॉलच्या जगतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक ठरवते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!  

रोनाल्डोनं दाखवून दिलं स्वत:च्या खेळावरील अन् कामगिरीवर प्रेम

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण असा प्रश्न विचारला तर रोनाल्डो असं उत्तर ऐकायला मिळालं तर त्यात नवलं वाटण्याजोगे काहीच नाही. आता खुद्द रोनाल्डोनंही मीच भारी असं म्हणत आपल्या खेळावरील प्रेम अन् आपल्या कामगिरीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. 

नेमकं काय म्हणाला रोनाल्डो?

पोर्तुगालचा स्टार आणि रिअल माद्रिद माजी फुटबॉलर सध्या सौदी अरेबियाच्या क्लबकडून खेळताना दिसतो.  बर्थडच्या निमित्ताने रोनाल्डोनं स्पॅनिश टेलिव्हिजसाठी एक खास मुलाखत दिलीये. यावेळी त्याने मी फुटबॉल जगतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलर असल्याचे म्हटले आहे. फुटबॉल जगतात मी सगळ्यात भारी आहे, असे सांगताना रोनाल्डो म्हणाला की, 

 मी फुटबॉलच्या इतिहासातील महान फुटबॉलपटू आहे. मी गोल मैदानात डाव्या पायाचा अधिक वापर करत नाही. पण डाव्या पायाने गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या आघाडीच्या १० मध्ये माझा नंबर नक्की लागतो. ही आकडेवारी मी फुटबॉलच्या इतिहासातील एक परिपूर्ण खेळाडू असल्याचा पुरावा आहे.       

 

आपल्या खेळाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की, मी मैदानात डोक्यानं खेळतो अन् चांगल्या फ्री कीक मारण्यातही आघाडीवर असतो. मी वेगानं धावतो. माझा खेळ दमदार आहे.   अन्य कुणी माझ्यापेक्षा भारी असू शकतं असा विचारच मी कधी केला नाही, असेही रोनाल्डोनं म्हटलं आहे. त्याचे हे वक्तव्य काहींना अहंकारी वाटू शकतं. पण त्याचं हे बोल नीट समजून घेतले तर सर्वोत्तम खेळाडूनं स्वत:वरील आत्मविश्वास कसा जपला पाहिजे, याचा  संदेशच त्याने दिला आहे.

मेस्सी भारी असल्याचे मान्य केलं, पण आपणही कमी नाही यावरही दिलाय जोर

पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डोनं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक २०१७ सामने खेळले आहेत. त्याच्या खात्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर १३५ गोलची नोंद आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. रोनाल्डोनं याआधीही अनेकदा आपल्या मुलाखतीमध्ये फुटबॉल जगतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू होण्याचा मानस बोलून दाखवला होता. कमालीच्या फिटनेस आणि मेहनतीच्या जोरावर त्याने ते करूनही दाखवलं. ज्या ज्या वेळी त्याला मेस्सी भारी की तू असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी या लोकप्रिय खेळाडूनं अर्जेंटिनाच्या मेस्सीचं नाव घेतल्याचेही पाहायला मिळाले आहे. पण त्याचे नाव घेताना तो आपणही कमी नाही, हे सांगायलाही मागे पडला नाही. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल