ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. २३ - मला षटकार मारता येत नाही म्हणून मी चौकारावर समाधान मानतो, मी जास्तीत जास्त धावा चौकारावर खेचत असतो. माझ्याजवळ मोठे षटकार मारण्याची कला नाही त्यामुळेच मी चौकार लगावण्यावर जास्त लक्ष दिले. असे बोल भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली ने मांडले. एक प्रकारे विराटने आपल्या खेळातील कुमकुवत बाजूच समोर आणली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय खेळातील प्रत्येक प्रकारात विराटचा दबदबा आहे.
भारतीय उपकर्णधार विराट कोहली ने आतापर्यंत २२ टी-२० सामन्यात फक्त २७ षटकार मारले आहेत. तर त्याच सामन्यात १२७ चौकार त्याने लगावले आहेत. उद्यापासून आशिया चषकास सुरवात होत आहे. भारताचा सलामीचा सामना यजमान बांग्लादेश सोबत होणार आहे.
आशिया चषकास सुरवात होण्याच्या पुर्वसंध्येला विराट पत्रकांराशी बोलत होता. तो पुढे म्हणाला सुरवातीला मी ज्यावेळी टी २० सामना खेळत होतो त्यावेळी पहिल्या १० चेंडूत फक्त १० धावा करायच्या आणि त्यानंतर जलद धावसंख्या वाढवायची.
आशिया चषकापुर्वी भारतीय संघ समतोल आहे. संघातील प्रत्येक खेळाडूकडे आत्मविश्वास आहे.