शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शैली सिंगने माझा विक्रम मोडल्यास आनंद होईल - अंजू बॉबी जॉर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 5:39 AM

वयाच्या १३ व्या वर्षी शैली राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत पाचव्या स्थानी होती. झांशी येथे जन्मलेल्या या खेळाडूला आईने मोठे केले. शैलीकडे नीरज चोप्रा, हिमा दास यांच्याप्रमाणेच ॲथलेटिक्स स्टार म्हणून पाहिले जाते. 

नवी दिल्ली : ‘उंचीने लहान, सडपातळ बांधा असलेली शैली सिंग सोबतच्या खेळाडूंमध्ये कुठेही फिट बसत नव्हती. तरीही लांब उडीतील प्रसिद्ध खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने शैलीतील गुण ओळखले. हार न मानण्याची स्वत:मधील वृत्ती शैलीमध्ये असल्याची जाणीव होताच अंजूने तिच्यावर मेहनत घेतली. शैली सिंगने रविवारी नैरोबीत जागतिक युवा (२० वर्षांखालील) ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रौप्य पदकाची कमाई केली. १७ वर्षीय शैलीचे सुवर्ण  एक सेंटिमीटरच्या फरकाने हुकल्याचे शल्य ती लपवू शकली नाही.  शैलीने अंतिम फेरीमधील तिसऱ्या प्रयत्नात ६.५९ मीटर अंतरावर उडी मारत आघाडी मिळवली; परंतु स्वीडनच्या मॅजा अश्कागने चौथ्या प्रयत्नात ६.६० मीटर उडी घेत शैलीला मागे टाकले. मॅजाची हीच उडी सुवर्ण पदकाची दावेदार ठरली.   

 वयाच्या १३ व्या वर्षी शैली राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत पाचव्या स्थानी होती. झांशी येथे जन्मलेल्या या खेळाडूला आईने मोठे केले. शैलीकडे नीरज चोप्रा, हिमा दास यांच्याप्रमाणेच ॲथलेटिक्स स्टार म्हणून पाहिले जाते. शैलीबाबत २००३ ची जागतिक स्पर्धेतील कांस्य विजेती अंजू म्हणाली,‘शैलीचे शरीर व मांसपेशी लांब उडीला अनुकूल आहेत. तिचा दृढ निश्चय पाहून दीर्घकाळ मैदान गाजवेल याची मनोमन खात्री पटली. ती लवकर शिकते, शिवाय नवीन गोष्टी आत्मसात करण्याच्या प्रयत्नांत असते. कधीही हार न मानण्याची वृत्ती असल्याने ती माझ्यासारखीच आहे.  यामुळेच मी आणि माझे पती रॉबर्ट प्रभावित झालो. यानंतर विशाखापट्टणमच्या राष्ट्रीय स्पर्धेत शैलीला पुन्हा पाहताच प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.  नोव्हेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या काळात आम्ही शैलीला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तिला बेंगळुरूच्या साई केंद्रात पाठविले.’

आईने घडवले शैलीला शैली सिंगची वाटचाल फारच प्रेरणादायी आहे. १७ वर्षांच्या या मुलीने गरिबीवर मात करीत देशाची पताका उंचावली. शैलीला आई वनितासिंग यांनी शिवणकाम करून घडवले. शैलीसह त्यांनी तीन मुलींचा सांभाळ केला. वडील नसल्याने आईने मुलींना पित्याची माया दिली. आर्थिक चणचणीमुळे रोजच्या जेवणासाठी अनेक तास  शिवणकाम चालायचे. शैलीकडे स्पाईकसाठी पैसे नव्हते. मात्र, २०१४ पासून शैलीच्या आयुष्याला कलाटणी लाभली.