शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

आयसीसी चेअरमनपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार- मनोहर

By admin | Published: May 10, 2017 8:41 PM

चेअरमनपदाचा कार्यकाळ ते पूर्ण करणार का, याबद्दलची अनिश्चितता आता संपुष्टात आलीआहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - जून 2018 पर्यंत मी पदावर कायम राहणार हे शशांक मनोहर यांनीच स्पष्ट केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) चेअरमनपदाचा कार्यकाळ ते पूर्ण करणार का, याबद्दलची अनिश्चितता आता संपुष्टात आलीआहे. आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन म्हणून शशांक मनोहर हे जून 2018 पर्यंत पदावर कायम राहतील, असे बुधवारी आयसीसीच्यावतीने सांगण्यात आले. मागच्या वर्षी मार्च महिन्यात मनोहर यांनी वैयक्तिक कारण पुढे करीत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तथापि आयसीसीच्या पूर्णकालीन तसेच सहयोगी सदस्यांनी त्यांना कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती. ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मनोहर यांनी आयसीसीत नव्या सुधारणा लागू करण्यास पुढाकार घेतला. या सुधारणा पूर्णपणे अमलात येईपर्यंत पदावर कायम राहण्याचा सदस्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला होता. सुरुवातीला मनोहर हे यंदा जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक आमसभेपर्यंतच पदावर राहणार होते. तथापि कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात आले आहे. मूळ नागपूरचे निष्णात वकील असलेले माजी बीसीसीआय अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर यांनी आयसीसीत लाभांश वाटप तसेच कार्यसंचालनाचे नवे मॉडेल आणले आहे. सदस्यांनी त्यांच्या कार्याला भक्कम पाठिंबा दर्शविला. दुबईत आयसीसी बैठकीदरम्यान यावर मतदान घेण्यात आले तेव्हा बीसीसीआयला लाभांश मॉडेलवर 1-13 आणि संचालन मॉडेलवर 1-12 अशा मोठा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. लाभांश तसेच संचालन मॉडेलला केवळ बीसीसीआयने विरोध दर्शविला. त्यामुळे विश्व क्रिकेटमध्ये सध्या बीसीसीआय एकाकी पडले आहे. मनोहर यांच्यामुळेच जगातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयला आर्थिक नुकसान झाल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत आहे. बीसीसीआय प्रशासकांच्या समितीनुसार (सीओए) बीसीसीआयच्या चिंतेचे मोठे कारण लाभांश मॉडेल नसून संचालन मॉडेल हेच आहे. दुसरीकडे मनोहर आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याने ईसीबी अध्यक्ष जाईल्स क्लार्क यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. जाईल्स हे आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन बनण्यास इच्छुक होते.