दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) आणि झिम्बाब्वे क्रिकेट (जेडसी) यांना ते दोन्ही देशांदरम्यानच्या आगामी मालिकेसाठी सुरक्षिततेच्या कारणामुळे आपले सामनाधिकारी नियुक्त करणार नसल्याची सूचना केली आहे.आयसीसीने त्यांच्या सुरक्षा सल्लागारांकडून मिळालेल्या रिपोर्टच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे. २00९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करणारा झिम्बाब्वे हा पहिला कसोटी संघ आहे.आयसीसी मंडळाने एप्रिल महिन्यात त्यांच्या बैठकीदरम्यान एक निर्णय घेतला होता. त्यानुसार पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेमुळे मालिकेसाठी आपले अधिकारी न पाठवण्याचा निर्णय घेतल्यास पंच आणि सामनाधिकारी नियुक्तीविषयीच्या नियमात थोडी सवलत दिली जाईल. त्यामुळे पीसीबी मालिकेसाठी स्थानिक सामनाधिकारी नियुक्त करू शकेल.झिम्बाब्वेचा संघ लाहोरमध्ये दोन टी-२0 आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी १९ मे रोजी पाकिस्तानला येत आहे.
सामनाधिकारी देण्यास आयसीसीचा नकार
By admin | Published: May 18, 2015 3:18 AM