मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबचे सह मालक नेस वाडिया यांनी सांगितले की, त्यांचे फ्रँचाईजी आपले तीन आयपीएल सामने दुष्काळजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्राबाहेर अन्य दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्याबाबत खूपच गांभीर्याने विचार करीत आहेत़ किंग्ज इलेव्हन पंजाबला महाराष्ट्रात तीन सामने खेळावयाचे आहेत़ संघाला सात मे रोजी नागपूरमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध खेळणार आहे़ तसेच १३ मे रोजी मुंबईमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध, तर २१ मे रोजी पुण्यात रायझिंग पुणे सुपर जॉर्इंट्सविरुद्ध खेळावयाचे आहे़ वाडिया म्हणाले, आम्ही मानवीय आधारावर यावर विचार करीत आहोत आणि खूपच गांभीर्याने विचार करीत आहोत़
किंग्ज इलेव्हनचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्याचा विचार सुरू : वाडिया
By admin | Published: April 12, 2016 3:43 AM