शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

"एवढेच होते तर केस कापायचे होते"; विनेशच्या सासऱ्यांनी सुचविला मार्ग, आधी सांगितला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 2:09 PM

Vinesh Phogat disqualify news updates: वजन वाढल्याचे विनेश फोगाटला आणि तिच्या प्रशिक्षकाला रात्रीच लक्षात आले होते. तिचे वजन कमी करण्यासाठी रात्रभर सायकलिंग,  जॉगिंग, स्किपिंग आदी विनेशने केले. विनेशच्या सासऱ्यांनी सांगितला मार्ग, हे विनेश किंवा भारतीय प्रशिक्षकांच्या लक्षात कसे आले नाही...

रेसलिंगमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळाले असते परंतू फायनलच्या दिवशीच १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते संसदेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच विनेशच्या सासऱ्यांनी देखील विनेशने केस कापले असते तर क्वालिफाय झाली असती, असे म्हटले आहे. 

Vinesh Phogat: विनेश फोगाटचे किती ग्रॅम वजन जास्त भरले, आता अपिलही नाही, पदकही नाही

वजन वाढल्याचे विनेश फोगाटला आणि तिच्या प्रशिक्षकाला रात्रीच लक्षात आले होते. तिचे वजन कमी करण्यासाठी रात्रभर सायकलिंग,  जॉगिंग, स्किपिंग आदी विनेशने केले. तरीही १०० सकाळी १०० ग्रॅम वजन जास्त भरले. भारताने विनेशला काही वेळ देण्याची विनंती केली परंतू ती मान्य केली गेली नाही. विनेशकडे वजन कमी करण्यासाठी १५ मिनिटे होती. 

यावर विनेशचे सासरे राजपाल राठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामागे कटही असू शकतो. १०० ग्रॅम वजनासाठी तिला अपात्र ठरविण्यात आले. एवढेच होते तर विनेशने तिचे केस कापायला हवे होते. केसांचेच वजन ३०० ग्रॅम असते, असे राठी म्हणाले आहेत. विनेश फोगाटचे रेसलर सोमवीर राठीसोबत लग्न झाले आहे. विनेश ही यापूर्वी ५३ किलो वजनी गटातून खेळत होती. परंतू तिने ऑलिम्पिकसाठी आपले वजन कमी केले होते व ५० किलो वजनी गटातून तिने फायनलपर्यंत धडक मारली होती. 

काल पात्र, आज अपात्र कशी? एवढे कठोर नियम? 100 ग्रॅमने असे काय झाले असते; जाणून घ्या ऑलिम्पिकचा नियम

विनेशला मेडल का नाही मिळणार...ऑलिम्पिकसाठी कुस्तीमध्ये फक्त दोन पदके असतात. गोल्ड आणि ब्राँझ मेडल दिले जाते. यामुळे विनेशला सिल्व्हर मेडलही दिले जाणार नाहीय. विनेशला आज रात्री १० वाजता अमेरिकेच्या सारा एन हिल्डरब्रांटशी दोन हात करायचे होते. नियमानुसार विनेशला शेवटच्या स्थानावर ठेवले जाणार आहे.

फ्रिस्टाईल रेसिंगमध्ये अनेक वजनी गट असतात महिलांसाठी 50,53, 57, 62, 68, 76 किलो वजनी गट आहेत. तर पुरुषांसाठी 57, 65, 74, 86, 97, 125 किलो असे वजनी गट आहेत. विनेशने आपला नेहमीचा ५३ किलोचा गट सोडून ५० किलोसाठी खेळ केला होता.  

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४