Sunil Chhetri, Asian Games 2023 Ind vs Ban: भारतीय फुटबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत बांगलादेशचा पराभव केला. या पराभवासह सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिला विजय मिळवला. यापूर्वी चीन विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध शानदार पुनरागमन केले. या सामन्यात भारताने बांगलादेशचा १-० असा पराभव केला. कर्णधार सुनील छेत्रीने अखेरच्या क्षणी भारतासाठी गोल केला. या गोलमुळे भारतीय संघ बांगलादेशचा पराभव करण्यात यशस्वी ठरला.
या सामन्यातील एकमेव गोल भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने 85 व्या मिनिटाला केला. भारतीय संघाला चीनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसरीकडे बांगलादेशचा म्यानमार विरुद्ध पराभव झाला.
पूर्वार्धात सामना बरोबरीत
दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सुरूवातीपासूनच गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत भारत-बांगलादेशच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. मात्र भारतीय संघाने उत्तरार्धात चमकदार कामगिरी केली. मात्र, दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा उठवण्यात त्यांना अपयश आले. या सामन्याच्या पहिल्या 20 मिनिटांत बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले, मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले.
सुनील छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवर केला गोल
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय फुटबॉल संघाला यजमान चीनचे आव्हान होते. मात्र या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याच वेळी बांगलादेशी संघाने आपल्या पहिल्या सामन्यात म्यानमार विरुद्ध मैदानात उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र, भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला. एकवेळ असा दिसत होता की सामना गोलशून्य बरोबरीत सुटण्याच्या दिशेने चालला आहे. मात्र सामन्याच्या 85 व्या मिनिटाला सुनील छेत्रीने गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. सुनील छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला आणि विजय मिळवला.