IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. हे दोन शेजारी जेव्हा खेळाच्या कोणत्याही मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात येणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा फुटबॉल संघ मुंबईत दाखला झाला, परंतु तेथेची त्यांची गफलत झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात आज बंगळुरू येथे सायंकाळी ७.३० वाजता फुटबॉल लढत होणार आहे, परंतु पाकिस्तानचे १४ खेळाडू मुंबईत अडकले. फक्त ६ खेळाडूच बंगळुरूला पोहोचले आहेत.
पाकिस्तान फुटबॉल संघाला २०२३च्या SAFF अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी मिळणार नाही. पण, १४ खेळाडूंची मुंबई ते बंगळुरू ही फ्लाईट मिस झाली अन् फक्त ६ खेळाडूच बंगळुरूला पोहोचलेय. त्यामुळे आजचा सामना वेळेत होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. आधीच व्हिसा वेळेत मान्य न झाल्याने पाकिस्तानचा संघ SAFF अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतात उशीरा दाखल झाला. त्यात हा गोंधळ झाला. मंगळवारी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्याचा व्हिसा मॉरिशियस येथे मिळाला. त्यांनी मध्यरात्री १.३० वाजता मॉरिशियसवरून मुंबईला येणारे विमान पकडले आणि मंगळारी ते बंगळुरूला दाखल होणार होते. पण, १४ खेळाडूंचं मुंबईवरून बंगळुरूला जाणारं विमान चुकलं. आता त्यांनी सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.
आजपासून बंगळुरू येथील कांतिरावा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्या लढतीने SAFF Championship स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अ गटात भारतासह पाकिस्तान, नेपाळ आणि कुवैत यांचा, तर ब गटात लेबानन, मालदिव, भुटान व बांगलादेश यांचा समावेश आहे. ४ जुलैपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.