Tokyo Olympics 2020 : भारताच्या 4 बाय 400 मीटर रिले महिला संघाला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयश आले. बहामा संघानं भारतीय महिला रिले संघाचे हे स्वप्न धुळीस मिळवले. बहामाच्या महिला रिले संघानं ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत 3 मिनिटे 29.40 सेकंदाची वेळ नोंदवली अन् भारतीय संघापेक्षा ही वेळ 0.02 सेकंद जलद ठरली. ( Bahamas pushed Indian women 4x400m relay team out of Tokyo 2020 with a performance of 3:29.40s, 0.02 faster than Indian performance). हा भारतासाठीच नव्हे तर सुवर्णकन्या हिमा दास ( Hima Das) हिच्यासाठी मोठा झटका आहे. आता हिमाला कोणत्याच क्रीडा प्रकारातून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळता येणार नाही.
अर्चना सुसींद्रन, हिमा दास, एस धनलक्ष्मी आणि द्युती चंद या महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले टीमला क्वालिफायसाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. संघाला थेट प्रवेश न मिळाल्यास रोड टू टोक्यो रँकिंगनुसार त्यांना ऑलिम्पिकचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण, आता तेही शक्य नाही.