शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

भारत पुन्हा ‘बॅकफूट’वर

By admin | Published: March 05, 2017 4:07 AM

आॅफ स्पिनर नाथन लियॉनच्या विक्रमी माऱ्यापुढे भारतीय फलंदाज पुन्हा एकदा नतमस्तक होताच दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी आॅस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावात

बंगळुरू: आॅफ स्पिनर नाथन लियॉनच्या विक्रमी माऱ्यापुढे भारतीय फलंदाज पुन्हा एकदा नतमस्तक होताच दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी आॅस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावात अवघ्या १८९ धावांत गुंडाळले. त्यानंतर सावध सुरुवात करून बिनबाद ४० पर्यंत मजल गाठून स्वत:ची स्थिती भक्कम केली.पुण्याच्या पराभवातून कुठलाही धडा घेतला नसल्याचे भारतीय फलंदाजांच्या आजच्या कामगिरीवरून स्पष्ट झाले. भारतात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा विदेशी गोलंदाज, अशी ख्याती मिळविणाऱ्या लियॉनने करिअरमधील सर्वश्रेष्ठ कामगिरीसह ५० धावांत ८ गडी बाद केले. दुसरीकडे, सलामीवीर लोकेश राहुलच्या एकाकी झुंजीनंतरही भारताचा डाव ७१.२ षटकांत गडगडला. राहुलने ३० आणि ६१ धावांवर दोनदा मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत २०५ चेंडूंत ९ चौकारांसह सर्वाधिक ९० धावा ठोकल्या.लियॉनने भारतात विदेशी गोलंदाजांकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीचा द. आफ्रिकेचा लान्स क्लूझनरचा विक्रम मोडला. क्लूझनरने नोव्हेंबर १९९६मध्ये कोलकाता कसोटीत ६४ धावांत ८ गडी बाद केले होते. खेळ थांबला तेव्हा आॅस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आॅणि मॅथ्यू रेनशॉ हे क्रमश: २३ आणि १५ धावांवर नाबाद आहेत. ईशांतच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने वॉर्नरचा झेल सोडला. आॅस्ट्रेलिया १४९ धावांनी मागे असून १० फलंदाज शिल्लक आहेत.सध्याच्या मालिकेत भारत तिन्ही डावांत २००चा आकडा गाठू शकलेला नाही. उपाहारापूर्वी चेतेश्वर पुजाराला (१७) बाद करणाऱ्या लियॉनने दुसऱ्या सत्रात विराट कोहली (१२), अजिंक्य रहाणे (१७), आश्विन (७), रिद्धिमान साहा (१), रवींद्र जडेजा (३) राहुल तसेच ईशांत शर्मा (०) यांचे बळी घेतले. (वृत्तसंस्था) कोहलीला बाद केल्यामुळे आनंद झालाविराट कोहलीला बाद केल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणारा आॅस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज नॅथन लियोनने भारतीय कर्णधाराने आपल्या चुकीने विकेट बहाल केल्याचे म्हटले आहे. आॅफ स्पिनर लियोनने शनिवारी ५० धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेताना कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. कोहलीने आपल्या चुकीने विकेट बहाल केल्यामुळे आॅस्ट्रेलियाला भारतीय संघाचा डाव माफक धावसंख्येत गुंडाळण्यात यश आले, असेही लियोन म्हणाला. या खेळपट्टीवर आश्विन वर्चस्व गाजवू शकतोभारतीय संघाचा मुख्य आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन या खेळपट्टीवर नॅथन लियोनच्या कामगिरीची बरोबरी करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास भारतीय फलंदाज लोकेश राहुल याने व्यक्त केला. खेळपट्टी पहिल्या दिवसापासून भंगण्यास सुरुवात झाली आहे. लियोनने ५० धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेतले. आॅस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारपासून प्रारंभ झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव केवळ १८९ धावांत संपुष्टात आला. राहुलने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाला, ‘‘आश्विन अव्वल गोलंदाज असल्याची आम्हाला कल्पना आहे. त्याने सुरुवातीला एक-दोन बळी घेतले म्हणजे त्याला सूर गवसेल आणि त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यास वेळ लागणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे.’’राहुल म्हणाला, ‘‘या खेळपट्टीवर जडेजाही उपयुक्त ठरू शकतो; पण त्यासाठी त्याने लियोनप्रमाणे खेळपट्टीचा प्रभावीपणे वापर करायला हवा. जडेजाला आज फारशी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही; पण तो डावखुऱ्या फलंदाजांना उजव्या यष्टीबाहेर मारा करू शकतो. त्याने जर तशी गोलंदाजी केली तर त्याला बरेच बळी घेता येतील. खेळपट्टी भंगण्यास सुरुवात झाली असून येथे फलंदाजी कठीण ठरेल.साडेपाच वर्षांनंतर संघात परतलेला अभिनव मुकुंद हा भोपळा न फोडताच बाद झाला. राहुल-पुजारा यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी करून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. लियॉनने पुजाराचा अडथळा दूर केल्यानंतर कर्णधार कोहलीलादेखील पायचित केले. अजिंक्य रहाणेदेखील लियॉनचा बळी ठरला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या ५ बाद १६८ धावा होत्या. चहापानानंतर घसरगुंडी झाली. भारताने अखेरचे ५ फलंदाज १५ धावांत गमविले. आस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीतील संघ कायम ठेवला, तर भारताने खांदेदुखीमुळे बाहेर झालेल्या मुरली विजयच्या जागी अभिनव मुकंदला संधी दिली. जयंत यादवचे स्थान करुण नायरने घेतले. धावफलकभारत पहिला डाव : लोकेश राहुल झे. रेनशॉ गो. लियॉन ९०, अभिनव मुकुंद पायचीत गो. स्टार्क ०, चेतेश्वर पुजारा झे. हँड्सकोम्ब गो. लियॉन १७, विराट कोहली पायचित गो. लियॉन १२, अजिंक्य रहाणे यष्टिचीत (वेड) गो. लियॉन १७, करुण नायर यष्टिचीत (वेड) गो. ओकिफी २६, रविचंद्रन आश्विन झे. वॉर्नर गो. लियॉन ७, रिद्धिमान साहा झे. स्मथ गो. लियॉन १, रवींद्र जडेजा झे. स्मिथ गो. लियॉन ३, उमेश यादव नाबाद ०, ईशांत शर्मा झे. हँड्सकोम्ब गो. लियॉन ०, अवांतर १६. एकूण : ७१.२ षटकांत सर्व बाद १८९ धावा. गडी बाद क्रम : १/११, २/७२, ३/८८, ४/११८, ५/१५६, ६/१७४, ७/१७८, ८/१८८, ९/१८९. गोलंदाजी : स्टार्क १५-५-३९-१, हेजलवूड ११-२-४२-०, ओकिफी २१-५-४०-१, मार्श २-०-२-०, लियॉन २२.२-४-५०-८. आॅस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर खेळत आहे २३, मॅट रेनशॉ खेळत आहे १५. अवांतर : २. एकूण : १६ षटकांत बिनबाद ४० धावा. गोलंदाजी : ईशांत शर्मा ५-०-८-०, उमेश यादव ४-१-१६-०, रविचंद्रन आश्विन ६-०-११-०, रवींद्र जडेजा १-०-५-०.