शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

भारत-बांगलादेश कसोटी : ही आहेत 10 वैशिष्ट्ये

By admin | Published: February 08, 2017 4:04 PM

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांशी निगडीत असलेल्या 10 रंजक बाबींचा घेतलेला हा आढावा

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली,  दि. 8 - कसोटी दर्जा मिळाल्यावर तब्बल 16 वर्षांनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ भारतात आला आहे.  भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांशी निगडीत असलेल्या 10 रंजक बाबींचा घेतलेला हा आढावा... 
 1 - भारत आणि बांगलादेशमध्ये आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले गेले असून, त्यातील सहा सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, या सहा विजयांपैकी चार वेळा भारताने बांगलादेशला डावाने मात दिली आहे.  तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.  
2 -   हैदराबाद कसोटीला सुरुवात झाल्यावर भारतात कसोटी सामना खेळणारा बांगलादेश हा नववा कसोटी संघ ठरेल. बांगलादेशच्या आधी कसोटी दर्जा प्राप्त असलेले अन्य 8 संघ भारतात कसोटी सामने खेळले आहेत.  
3 - राजीव गांधी स्टेडियम आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारासाठी लकी आहे. अश्विनने येथे खेळलेल्या दोन कसोटीत 18 बळी टिपले आहेत, तर पुजाराने येथे 181.5 च्या सरासरीने 363 धावा कुटल्या आहेत. 
4 -  बांगलादेशचा संघ आतापर्यंत परदेशात 44 कसोटी सामने खेळला असून, त्यातील केवळ तीन सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे. त्या पैकी दोन विजय वेस्ट इंडिज आणि एक विजय  झिम्बाब्वेविरुद्ध मिळवलेला आहे. 
5 -  भारत आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने 136.66च्या सरासरीने 820 धावा कुटल्या आहेत.  त्यात 5 शतकांचाही समावेश आहे. 
 6-   दोन्ही संघांत झालेल्या कसोटी सामन्यांच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम झहीर खानच्या नावे आहे. त्याने सात सामन्यात 31 बळी टिपले आहेत.
 7 - बांगलादेशविरुद्ध होणारा कसोटी सामना  कर्णधार म्हणून विराटचा 23वा कसोटी सामना असेल. त्याबरोबरच तो सर्वाधिक सामन्यात कप्तानी करण्याच्या भारतीय कर्णधारांच्या यादीत कोहली नवव्या स्थानी पोहोचेल. 
  8 - कोहलीचा संघ गेल्या 18 कसोटी सामन्यांपासून भारतीय मैदानात अपराजित आहे. आता अजून दोन सामन्यात अपराजित राहिल्यास सलग 20 सामन्यात अपराजित राहण्याचा 1977 ते 1980 दरम्यानच्या आपल्या जुन्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी भारताकडे असेल. 
9 - भारताने विजय मिळवल्यास तो भारताचा घरच्या मैदानावरील 95वा विजय असेल. घरच्या मैदानावर भारतापेक्षा अधिक विजय केवळ ऑस्ट्रेलिया (234), इंग्लंड (207) आणि दक्षिण आफ्रिका (96) या संघांनीच मिळवले आहेत. 
10 -   बांगलादेशचा शाकिब अल हसन हा एकाच कसोटी सामन्यात शतक आणि 10 बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा जगातील केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे. शाकिबच्या आधी अशी किमया इयान बॉथम आणि इम्रान खान यांनी केली होती.