ऑनलाइन टीम
मीरपूर, दि. २४ - बांग्लादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमवल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघाने केलेल्या ३१७ धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशने ४७ षटकात २४० धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला यजमान संघावर ७७ धावांनी विजय मिऴविता आला.
बांग्लादेशच्या फलंदाजानी सुरुवातीला चांगली कामगिरी गेली, मात्र १५ व्या षटकानंतर त्यांची खराब कामगिरी झाली. फलंदाज शब्बीर रहमानने सर्वाधिक जास्त धावा केल्या. शब्बीर रेहमानेने ४३ धावा केल्या. त्यानंतर सौम्या सरकारने ४०, तमीम इक्बाल ५, लिट्टन दास ३४, मुशफिकुर रहीम २४, शकीब हसन २०, नासीर हुसेन ३२, रुबेल हुसेन २ आणि मशरफी मूर्तजा शून्यांवर बाद झाला.
याआधी तिस-या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजानी चांगली कामगिरी करत ५० षटकात ३१७ धावा केल्या. यामध्ये भारतीय फलंदाज शिखर धवने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ७३ चेंडूत १० चौकार लगावत ७५ धावा केल्या, त्याला गोलंदाज मशरफी मूर्तजाने झेलबाद केले. तर, त्यापाठोपाठ आलेल्या महेंद्रसिंग धोणीने दमदार सुरुवात करत ७६ चेंडूत एक षटकार आणि सहा चौकारांचा मारा करत ६९ धावा केल्या. महेंद्रसिंग धोणीलाही गोलंदाज मशरफी मूर्तजाने झेलबाद केले. याआधी अंबाती रायडू (४४) विराट कोहली (२५), रोहित शर्मा (२९) आणि सुरेश रैना ३८ धावांवर बाद झाला.
भारतीय गोलंदाज सुरेश रैनाने तीन तर आर. आश्विन आणि धवल कुलकर्णी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. अंबाती रायडू, अक्षर पटेल आणि स्टुअर्ट बिन्नी यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. तसेच, बांग्लादेशकडून गोलंदाज मशरफी मूर्तजाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले, तर मुस्तफिजूर रहमानने दोन आणि साकिब हसनने एक विकेट घेतला.