शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भारतानं बांगलादेशला चिरडलं, थाटात फायनलमध्ये प्रवेश

By admin | Published: June 15, 2017 9:36 PM

भारत आणि बांगलादेशमध्ये उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत 265 धावांचा पाठलाग करताना भारतानं चांगली सुरुवात केली

ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 15 -  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेशमध्ये उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत 265 धावांचा पाठलाग करताना भारतानं 9 गडी राखून विजय मिळवत फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. भारताकडून मैदानावर आलेला शिखर धवन 34 चेंडूंत 7 चौकार आणि एक षटकार लगावत 46 धावा काढून तंबूत परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. रोहित शर्मानं आतापर्यंत 123 धावा काढून शतक पूर्ण केलं. तर विराट कोहलीनेही अर्धशतक पूर्ण करत 96 धावा केल्या आहेत. कोहली आणि शर्मानं सर्वाधिक 178 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. बांगलादेशकडून मूर्तझाला धवनचा एक बळी मिळवण्यात यश आलं आहे. रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच या किताबानं सन्मानित करण्यात आलं आहे. तत्पूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले होते. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहिमने 123 धावांच्या केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजीमध्ये चातुर्याने केलेले बदल आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी केलेला टिच्चून मारा याच्या जोरावर भारताने बांगलादेशला 7 बाद 264 धावांवरच रोखले होते. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न बांगलादेशी फलंदाजांनी केला होता. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल (70) आणि मुशफिकूर रहिम (61) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 123 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 2 बाद 150 अशी मजल मारली होती. पण ही जोडी धोकादायक ठरतेय असे वाटत असतानाच विराटने केदार जाधवच्या हाती चेंडू दिला. मग केदारने तमीम आणि मुशफिकूरची विकेट काढत भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. शाकिब अल हसन (15) आणि महमदुल्ला (21) हेही झटपट बाद झाल्याने बांगलादेशच्या डावाला ब्रेक लागला. अखेर निर्धारित 50 षटकात त्यांना 7 बाद 264 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन तर, रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.