India Pakistan, Hockey World Cup 2023: आशिया कप 2022 मध्ये भारताने इंडोनेशियाचा 16-0 असा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. यासह भारतीय संघ सुपर 4 साठी पात्र ठरला. विशेष म्हणजे भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानला मोठा पराभव धक्का लागला असून त्यांचा संघ Hockey World Cup 2023 मधून बाहेर पडला. आशिया चषक 2022 च्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला या सामन्यात मोठा विजय आवश्यक होता. भारताने संधीचं सोनं केलं आणि 16-0 ने विजय मिळवला.
भारतासह 'हे' 3 संघ ठरले वर्ल्ड कपसाठी पात्र
या सामन्याचा 2023 मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकावर परिणाम झाला. कारण येथे मोठ्या फरकाने सामना जिंकणारा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला असता. आता भारत जिंकल्याने विश्वचषकासाठी पात्र ठरला आणि पाकिस्तान बाहेर पडला. त्यामुळे आता भारतासह जपान, कोरिया आणि मलेशिया हे देश विश्वचषकासाठी पात्र ठरले. दुसरीकडे, या आशिया कपबद्दल बोलायचे झाले तर, जपान आणि भारत बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
असा रंगला सामना
भारताने या सामन्यात सुरुवातीपासूनच दडपण ठेवले आणि धडाधड गोल केले. यानंतर भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी केली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचा स्कोअर 3-0 होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 6-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये हा स्कोअर 10-0 वर झाला आणि शेवटी सामना संपताना हा स्कोअर 16-0 वर गेला. यासह भारताने इंडोनेशियावर दमदार विजय नोंदवला.