इपोह : स्ट्रायकर मनदीप सिंगने केलेल्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर भारताने अझलन शाह हॉकी स्पर्धेत जपानचा ४-३ असा पराभव केला. त्याचवेळी, जपानने जबरदस्त टक्कर देताना भारताला विजयासाठी चांगलेच झुंजवले. रुपिंदर पालने सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत भारताला १-० असे आघाडीवर नेले. तसेच, सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर मनदीपने आपला जलवा दाखवत सलग तीन गोल करुन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी सहाव्या मिनिटाला मनदीपने भारतासाठी पहिला गोल केला होता.त्याचप्रमाणे, जपानकडून हेइता काजुमा मुराता (१०वे मिनिट), हेइता योशिहारा (४३) आणि जेंकी मितानी (४५) यांनी शानदार गोल करुन भारताला दडपणाखाली आणले. मनदीपने जबरदस्त आक्रमण करताना अनुक्रमे ४५, ५१ आणि ५८व्या मिनिटाला गोल करुन भारताच्या विजयावर शिक्का मारला. यासह स्पर्धेत हॅटट्रीक नोंदवणारा मनदीप तिसरा खेळाडू ठरला. याआधी आॅस्टे्रलियाचा टे्रंट मिटन आणि टॉम क्रेग यांनी हॅट्ट्रीक नोंदवली आहे. सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांच्या खेळामध्ये अत्यंत आक्रमक खेळ झाला. भारताने सातत्याने हल्ले करताना जपानला कमालीचे दडपण आणले. यानंतर रुपिंदरने जबरदस्त ड्रिबलिंग करुन भारताचा पहिला गोल साकारला. मात्र, जपानने जबरदस्त पुनरागमन करताना चार मिनिटांनी काजुमा मुराताच्या जोरावर बरोबरी साधली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीयांनी चमकदार खेळ करताना २६व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. परंतु, रुपिंदरचा नेम चुकल्याने पुन्हा एकदा भारताने गोल करण्याची संधी गमावली. ४३व्या मिनिटाला हेइता योशिहाराने एकट्याने ड्रिबल करताना अप्रतिम गोल केला. भारताने नंतर २ मिनिटांनी मनदीपने केलेल्या गोलच्या जोरावर बरोबरी साधली. मात्र, जेंकी मितानीने केलेल्या गोलच्या जोरावर ४६व्या मिनिटाला जपानने पुन्हा आघाडी घेतली. भारताने वेगवान खेळ करताना लवकरच बरोबरीचा गोल नोंदवला. यानंतर, ५८व्या मिनीटाला रुपिंदर पालने उजव्या बाजूने केलेल्या पास अचूकपणे घेताना मनदीपने रिव्हर्स शॉट मारत गोल करुन भारताचा विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)
भारताने जपानला ४-३ असे नमवले
By admin | Published: May 04, 2017 12:43 AM