शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

महामुकाबल्यात भारताचा विजय, पाकिस्तानाला 124 धावांनी लोळवलं

By admin | Published: June 04, 2017 11:30 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 125 धावांनी लोळवतं आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली.

ऑनालइन लोकमतबर्मिंगहॅम, दि. 4 - चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 125 धावांनी लोळवतं आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानाला 320 धावांचे आव्हान दिले होते. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानाला 41 षटकांत 289 धावांचे सुधारीत लक्ष दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 164 धावांत बाद झाला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. भारताकडून यादवने तीन फलंदाज बाद केले तर पंड्या, आणि जाडेजाने प्रत्येकी दोन बळी मिळवले. तर भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतलाभुवनेश्वर कुमारने सलामीवीर अहमद शहझादला 12 धावांवर पायचीत केल्यावर उमेश यादवने फॉर्मात असलेल्या बाबर आझमला स्वस्तात माघारी धाडले आहे. बाबर आझामला उमेश यादवने ८ धावांवर बाद केले. यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या अझर अलीला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीर अजहर अलीने दमदार अर्धशकत करत संघाची धावसंख्या वाढवली. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. शोयब मलिकने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत संघाची धावसंऱ्या वाढवण्याता प्रयत्न केला. पण जाडेजाच्या एका सुरेख फेकीवर मलिक बाद झाला. मलिक बाद झाल्यानंतर कर्णधार सर्फराज अहमदही तंबूत परताला. सर्फराज अहमदला हार्दिक पंड्याने 15 धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. अमाद वासिमही हार्दिक पंड्याचा शिकार ठरला.

 

त्यापूर्वी,  एकीकडे एजबेस्टनच्या मैदानात पावसाची रिमझिम सुरू असतानाच भारतीय फलंदाजांनीही धावांची जोरदार बरसात केली.  रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि विराट कोहली यांनी फटकावलेली शानदार अर्धशतके आणि शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने केलेल्या षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर भारताने 3 बाद 319 धावा कुटल्या.  

 पावसाच्या व्यत्ययामुळे वारंवार थांबत असलेल्या लढतीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील साखळी लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताने सावध सुरुवात केली. दरम्यान,  दहाव्या षटक सुरू असताना पहिल्यांदा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. तोपर्यंत रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारतीय सलामीवीरांनी 9.5 षटकात संघाला बिनबाद 46 धावांपर्यंत मजल मारून दिली होती.  
 
पाऊस थांबल्यावर धवन आणि रोहितने फलंदाजीचा गिअऱ बदलला. दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करत संघाला शंभरीपार नेले. जोरदार फटकेबाजी करणारा शिखर धवन 65 चेंडूत 68 धावा काढून माघारी परतला. शादाब खानने धवनला अझर अलीकडे झेल देण्यास भाग पाडले. शिखर धवनने बाद होण्यापूर्वी रोहित शर्मासोबत दमदार 136 धावांची शतकी सलामी दिली. 
धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटची मैदानावर जमली. दरम्यान, पुन्हा पावसाचा व्यत्यय आला.  पाऊस थांबल्यावर दोन षटके कमी करून सामना 48 षटकांचा करण्यात आला. रोहित शर्मा दमदार फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रोहित शर्माचे शतक थोडक्यात हुकले. त्याने 91 धावांची खेळी केली.
 
त्यानंतर युवराज आणि कोहलीने तुफान फटकेबाजीस सुरुवात करत पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे काढली. आज विराट कोहलीपेक्षाही युवराज अधिक आक्रमकपणे खेळत होता. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण  करत संघाला तीनशे धावांच्या उंबरठ्यावर पोहोचवले. याचदरम्यान युवराज 53 धावा काढून बाद झाला. अखेर शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने तीन षटकार ठोकत भारताला 319 धावांपर्यंत मजल मारून दिली. विराट 81, तर पांड्या 20 धावा काढून नाबाद राहिले. 
 

धावफलक

 

भारत : रोहित शर्मा धावबाद (बाबर आझम/सर्फराज अहमद) ९१, शिखर धवन झे. अझहर अली गो. शादाब खान ६८, विराट कोहली नाबाद ८१, युवराज सिंग पायचीत गो. हसन अली ५३, हार्दिक पंड्या नाबाद २0. एकूण : ४८ षटकांत ३ बाद ३१९.

गडी बाद क्रम : १-१३६ (शिखर धवन, २४.३), २-१९२ (रोहित शर्मा, ३६.४). ३-२८५ (युवराज सिंग, ४६.२).

गोलंदाजी : मोहंमद आामर ८.१-१-३२-0, इमाद वसीम ९.१-0-६६-0, हसन अली १0-0-७0-१, वहाब रियाज ८.४-0-८७-0, शादाब खान १0-0-५२-१, शोएब मलिक २-0-१0-0.