ग्रेटर नोएडा : मयंक आगरवालने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिया ब्लू संघाने दिवस रात्री दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया रेड संघाविरुद्ध दुसऱ्या डावात ३ बाद १३९ धावांपर्यंत मजल मारली. इंडिया ब्लू संघाकडे आता ४७६ धावांची आघाडी आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे फक्त ३३ षटकेच खेळली गेली. इंडिया ब्लू संघाने पहिल्या डावात ६९३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता. इंडिया रेडच्या पहिल्या डावात ३५६ धावा केल्या होत्या. इंडिया ब्लू संघाचा कर्णधार गौतम गंभीरने इंडिया रेड संघाला फॉलोआॅन दिला नाही. इंडिया ब्लू संघाच्या आगरवालने ८३ चेंडूत ६ चौकारांच्या साहाय्याने ५२ धावा केल्या. कर्णधार गौतम गंभीर ३६ धावा काढून बाद झाला होता. दिनेश कार्तिकसुद्धा १६ धावा करून तंबूत परतला. आजचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा २२ व रवींद्र जडेजा तीन धावांवर खेळत होता. इंडिया रेडकडून कुलदीप यादवने आगरवाल व गंभीरला, तर अमित मिश्राने कार्तिकला बाद केले.
इंडिया ब्लू संघाला ४७६ धावांची आघाडी
By admin | Published: September 14, 2016 5:13 AM