लोडरहिल (अमेरिका) : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ यंदा मायदेशात खेळल्या जाणाºया मालिकांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावू शकतो, असे मत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचेनेतृत्व करणाºया महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. भारतीय संघ मायदेशत न्यूझीलंड, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांसोबत एकूण १३ कसोटी सामने खेळणार आहे.धोनी म्हणाला,‘कर्णधार कोहलीच्या मार्गदर्शनाखाली संघाला चांगला सूर गवसत आहे. सर्व वेगवान गोलंदाज फिट असल्यामुळे आणि चांगली कामगिरी करीत असल्यामुळे आगामी कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघ वर्चस्व गाजवण्याचेसंकेत मिळत आहेत.’रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा टी-२० आंतररष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला,‘वन-डे व टी-२० मध्ये भारतीय संघ तुल्यबळ आहेच, पण आता कसोटी क्रिकेटमध्येही भारतीय संघवर्चस्व गाजवेल. भारतीय संघात फलंदाजीमध्ये चांगला अनुभव आहे. गेल्या अडीच वर्षात एक-दोन बदल वगळता फलंदाजी क्रम सारखाच आहे. अनुभवातून बरेच काही शिकायला मिळते. त्याचप्रमाणे सर्वच वेगवान गोलंदाज फिट आहेत.त्यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरत आहे. आपल्याकडे १० वेगवान गोलंदाज असूनही चांगली बाब आहे. आता आपण अधिक सामने खेळत असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना रोटेट करण्याचा पर्याय आहे.’धोनी पुढे म्हणाला,‘संघाची प्रतिभा व अनुभव आता कामगिरीत दिसत आहे.यंदाच्या मोसमात १३ कसोटी सामने खेळायचे आहेत. सर्वकाही अनुकूल घडले तर सत्राच्या अखेर भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहील. पहिल्या व दुसºया स्थानावरील संघांदरम्यान मानांकन गुणांचा मोठा फरक राहील.’दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेबाबत बोलताना धोनी म्हणाला,‘दोन्ही सामन्यांसाठी असलेल्या खेळपट्ट्यांमध्ये विशेष फरक नव्हता, दुसºया लढतीत अमित मिश्राला खेळविणे आमच्यासाठी फायदेशीर ठरले. त्यामुळे विंडीज संघाला१५० पेक्षा कमी धावसंख्येत रोखण्यात यश आले. याच खेळपट्टीवर विंडीजनेपहिल्या लढतीत २४५ धावा कुटल्या होत्या. ’धोनीने टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या अमेरिकेतील स्थळाची प्रशंसा केली.धोनी म्हणाला,‘हा दौरा यशस्वी ठरला. आम्ही येथे पुन्हा कधीही मालिकाखेळण्यासाठी येऊ शकतो. दुर्दैवाने पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरी लढत रद्दझाली. येथील वातावरण क्रिकेटसाठी अनुकूल आहे.’ (वृत्तसंस्था)