गोल्डकोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकीकडे उत्तेजकांची इंजेक्शन्स मिळाली. तर दुसरीकडे जवळपास सव्वा दोन लाख कंडोम मोफत वाटली जाणार आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जवळपास ६६०० खेळाडूंचा समावेश आहे, तर ७१ देश या स्पर्धेत उतरले आहेत. बुधवारी होणाऱ्या उदघाटन सोहळ्यासाठी हजारो खेळाडू आणि कर्मचारी क्रीडानगरीत दाखल झाले आहेत. यावेळी खेळाडूंसाठी सुसज्ज व्यवस्था केली असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
खेळाडूंसाठी जवळपास सव्वा दोन लाख कंडोमबरोबर १७ हजार टॉयलेट रोल्सही आणण्यात आले आहेत. त्याचबरोबर नि:शुल्क आईसक्रीमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी क्रीडाग्रमात २४ तास खानपान सेवा उपलब्ध असणार आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ११ दिवस चालणार आहे. या दरम्यान प्रतिव्यक्ती ३४ कंडोम म्हणजे दिवसाला तीन या हिशेबाने मोफत कंडोमची व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण कोरियात अलिकडेच झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये १ लाख १० हजार मोफत कंडोम वाटण्यात आले होते. हा या हिवाळी ऑलिम्पिकमधला विक्रम आहे.