मुंबई : ‘भारतीय क्रिकेटला सध्या काही चांगले वेगवान गोलंदाज मिळाले आहेत. यांमध्ये जसप्रीत बुमराहने इतरांच्या तुलनेत लक्ष वेधले असून, अप्रतिम यॉर्कर चेंडू टाकण्याच्या क्षमतेने मला प्रभावित केले आहे,’ असे मत आॅस्टे्रलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात नवोदित गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या ‘बॉलिंग मास्टर’चे लीच्या हस्ते लाँचिंग झाले, त्या वेळी त्याने आपले मत मांडले. ली म्हणाला, ‘‘ईशांत शर्माकडे सध्या ७० कसोटी सामने खेळल्याचा दीर्घ अनुभव आहे. तसेच, उमेश यादवकडे सातत्याने वेगवान मारा करण्याची क्षमता आहे. एकूणच सध्या भारताकडे चांगल्या दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत.’’सचिन तेंडुलकरने उमेश जितकी अधिक गोलंदाजी करेल, त्याचा अधिक फायदा भारताला होईल, असे म्हटले होते. यावर लीने सांगितले, ‘‘नक्कीच मी सचिनच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. जेवढी अधिक गोलंदाजी उमेश करेल, तेवढी जास्त तो प्रगती करेल.’’ (क्रीडा प्रतिनिधी)
भारताकडे सध्या चांगले वेगवान गोलंदाज
By admin | Published: April 13, 2017 4:08 AM