शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

अंतिम लढतीत भारत कोरियाकडून पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:36 AM

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : योंगसिल लीने नोंदविलेला गोल ठरला निर्णायक

डोंगाई सिटी (कोरिया) : भारतीय महिला हॉकी संघाला जेतेपद राखण्यात अखेर अपयश आले. पाचव्या महिला आशियाई चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत रविवारी भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध ०-१ ने पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण कोरियाने बचाव अभेद्य राखला. त्यांच्यातर्फे योंगसिल लीने २४ व्या मिनिटाला नोंदवलेला मैदानी गोल अखेर निर्णायक ठरला.दक्षिण कोरियाने भारतीय बचाव फळीची सुरुवातीला चांगली परीक्षा घेतली. त्यांनी मधल्या फळीत चेंडूवर नियंत्रण राखत भारतावर दडपण आणले. भारतानेही त्यांना चोख उत्तर दिले. दक्षिण कोरियाला काही चांगल्या संधी मिळाल्या, पण सुरुवातीच्या १५ मिनिटांमध्ये गोलफलक कोराच होता. कोरियाने त्यानंतर वर्चस्व गाजवत दोन मिनिटांमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. भारतीय गोलकिपर सविताने चांगली कामगिरी करीत संघावरील संकट टाळले. कोरियाला अखेर २४ व्या मिनिटाला गोल नोंदवण्यात यश आले. मी ह्यून पार्कने उजव्या बाजूने बेसलाईनपासून चेंडूवर नियंत्रण राखत आगेकूच केली. तिने भारतीय गोलक्षेत्रात पास दिला आणि लीने दिशा देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने लय गमावली. भारताने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण कोरियन खेळाडूंनी चांगला बचाव केला. कोरियाला ४३ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवण्याची संधी होती, पण मी ह्यून पार्कच्या फटक्यावर सविताने चांगला बचाव केला. कोरियाने त्याने एक मिनिटाने चौथा पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण सविताने त्यांना आघाडी वाढविण्याची संधी दिली नाही.अखेरच्या क्वार्टरमध्ये कोरियन खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण राखण्याची भूमिका स्वीकारली. त्यांनी भारताच्या आघाडीच्या फळीला संधी मिळणार नाही, याची खबरदारी घेतली. भारताने गोलकिपर सविताच्या स्थानी अतिरिक्त खेळाडूला खेळविले, पण कोरियाच्या अभेद्य बचाव भेदण्यात यश आले नाही.दक्षिण कोरियाने तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. यापूर्वी २०१० व २०११ मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले होते. भारताला दुसºयांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यापूर्वी २०१३ मध्ये अंतिम लढतीत भारताला जपानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय स्ट्रायकर वंदना कटारिया स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली, तर युवा लालरेमसियामी उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. स्ट्रायकर नवनीत कौर व वंदना कटारिया आणि चीनची झियोमिंग सोंग यांनी या स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी