शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

"ती"च्या मुळेच भारताचा पराभव

By admin | Published: June 19, 2017 6:42 AM

आतापर्यंत तलवारीसारख्या तळपणाऱ्या भारतीय फलंदाजांची कामगिरी पाकपेक्षा सरस ठरेल असेच वाटले होते. विराट कोहलीसह त्याचे शेरही ढेर झाले.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 19 - विराट कोहलीची टीम इंडियाच जिंकणार, हे अवघे जग ओरडून सांगत असताना पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव केला. आतापर्यंत तलवारीसारख्या तळपणाऱ्या भारतीय फलंदाजांची कामगिरी पाकपेक्षा सरस ठरेल असेच वाटले होते. विराट कोहलीसह त्याचे शेरही ढेर झाले. त्यानंतर या पराभवाची कारणे काय आहेत हे अनेकजण शोधत आहेत. मात्र आम्हाला एक कारण सापडले आहे. पराभवाचे हे ठोस कारण असू शकते अशी शक्यता किंवा निवळ योगागोग ही असू शकतो. सोशल मीडियावर याबाबत खमंग चर्चाही सुरु आहेत. भारताच्या पराभवाचे कारण आहे पाकिस्तानी पत्रकार...तुम्हाला यावर विश्वास बसला नाही ना..पण पाकिस्तानी क्रीडा पत्रकार झैनाब अब्बास ने ज्या कर्णधारासोबत सेल्फी घेतला आहे तो संघ सामना हरल्याचा अजब योगायोग या स्पर्धेत दिसून आला आहे. सध्या विराट कोहली आनी त्या पत्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झैनाबसोबत ज्या टीमचा प्लेअर किंवा कर्णधार सेल्फी काढतो ती टीम हरते अशी एक सुरस कथा सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होते आहे. यामधली सत्यता पडताळून पहावी लागेल. पण आश्चर्याची बाब म्हणजे झैनाबने ज्या खेळाडूंसोबत फोटो काढले आहेत, ते खेळाडू एकतर शून्यावर बाद झालेत किंवा त्यांना मोठी खेळी करता आली नाही. तसेच पाकिस्तानसोबत सामना असताना झैनाबने प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत सेल्फी काढला तो संघ हरला आहे. आजही तसेच घडले. युवराज सिंग आणि विराट कोहलीसोबत झैनाबने सेल्फी काढला. आता हे दोन सेल्फीच टीम इंडियाच्या पराभवाचे कारण असल्याचे सोशल मीडियावर चर्चा आहे. लॉडर्स मैदानावर पाकिस्तानी फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 339 धावांचे तगडे आव्हान उभे केले होते.भारताचा डाव सुरू झाला तेव्हा एक-एक खेळाडू पटापट बाद होत तंबूत परतताना दिसले. कागदावर बलाढ्य भासणारे भारतीय फलंदाज मोक्याच्या क्षणी ढेपाळले आणि रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला 180 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या दारूण पराभवाला झैनाबसोबत काढलेला सेल्फी कारणीभूत होता असा एक विषय आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तसेच झैनाबने युवराज आणि विराटसोबत काढलेले सेल्फीही व्हायरल होत आहेत. त्यामुळे झैनाब ही तिच्या पत्रकारीतेपेक्षा तिच्या सोबत खेळाडूंनी काढलेल्या सेल्फीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.