शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

भारताचा न्यूझीलंडकडून पराभव

By admin | Published: April 14, 2016 2:54 AM

भारतीय संघाला बुधवारी २५व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत न्यूझीलंडकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागल्याने पुढील प्रवास कठीण झाला आहे. या स्पर्धेच्या

इपोह : भारतीय संघाला बुधवारी २५व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत न्यूझीलंडकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागल्याने पुढील प्रवास कठीण झाला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक द्यायची झाल्यास यजमान मलेशियावर विजय नोंदविण्याचे आव्हान भारतापुढे उभे राहिले आहे.गत चॅम्पियन न्यूझीलंडने केन रसेल (२८व्या मिनिटाला) आणि निक विल्सन (४१व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे भारताला पराभूत केले. भारताकडून एकमेव गोल मनदीपसिंग याने ३६व्या मिनिटाला केला. विल्सनचा गोल भारतीय बचाव फळीच्या चुकीमुळे झाला. भारतीय गोलकीपर अपयशी ठरल्यानंतर बचाव फळीतील हरमनप्रीत याला चकवून विल्सनने चेंडू गोलजाळीत ढकलला. भारत जिंकला असता, तर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असता. शिवाय, सामना ड्रॉ झाला असता, तरी न्यूझीलंडच्या पुढे राहिला असता; पण विजयामुळे न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आला. यानंतर भारतीय संघ मलेशियाकडून पराभूत झाल्यास स्पर्धेचा अंतिम सामना आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड असा होईल. आॅस्ट्रेलियाने सलग ४ विजयांतून १२ गुण मिळविले असून, न्यूझीलंडचे ६ सामन्यांत ११ आणि भारताचे ५ सामन्यांत ९ गुण आहेत.आकाश चिकटेच्या छातीवर चेंडू आदळल्याने संघ व्यवस्थापनाने सामना सुरू होण्याआधी गोलकीपर बदलण्याचा निर्णय घेतला. हरज्योतने गोलकीपरची भूमिका बजावली. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर २०व्या मिनिटाला मिळाला. न्यूझीलंडचा गोलकीपर डेव्होन मॅन्चेस्टर याने रूपिंदरपाल सिंगचा ‘ड्रॅगफ्लिकर’ परतवून लावला. केन रसेल याने २८व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. भारताने प्रत्युत्तरात वारंवार हल्ले चढविले. त्यात यश येऊन तलविंदरच्या पासवर मनदीपने गोल नोंदविला. चार मिनिटांनंतर एस. व्ही. सुनील याने प्रतिस्पर्धी बचाव फळी भेदली; पण चेंडूवरील नियंत्रण सुटल्याने गोल होऊ शकला नाही. पुढच्या मिनिटाला विल्सनने भारतीय कमकुवत बचाव फळीचा लाभ घेऊन गोल नोंदविला. भारताला उत्तरार्धात मिळालेले पेनल्टी कॉर्नर वाया गेले. (वृत्तसंस्था)संघात ऊर्जा नव्हती : रोलॅन्ट ओल्टमन्सइपोह : आतापर्यंतच्या सामन्यात भारतीय संघ ज्या ताकदीने खेळला ती ताकद आणि ऊर्जा न्यूझीलंडविरुद्ध दिसलीच नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी पराभवानंतर व्यक्त केली. उकाडा आणि दमटपणा याचा कामगिरीवर विपरीत परिणाम झाला. आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलो. येथे तापमान अधिक आहे; शिवाय मैदानावर पाण्याचे फवारे मारल्यानंतर उकाडा असह्य होतो. उकाड्यामुळे पेनल्टीवरदेखील परिणाम झाला. मैदानावर घसरण असल्यामुळे आमचे खेळाडू ‘परफेक्ट’ कामगिरीत मागे पडले, असे ओल्टमन्स यांचे मत होते.दुष्काळग्रस्तांसाठी हॉकी इंडियाचे दहा लाखनवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळावर तीव्र चिंता व्यक्त करीत हॉकी इंडियाने दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीत दहा लाख रुपये दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना ही रक्कम लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.