शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
3
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
4
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
5
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
6
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
7
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
9
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
10
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
11
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
12
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
13
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
14
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
15
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
18
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
19
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
20
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य

देवधर चषकावर ‘भारत-अ’चे नाव

By admin | Published: January 30, 2016 2:14 AM

सलामीवीर फैज फैजलची नाबाद शतकी खेळी, मुरली विजय व केदार जाधवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत-अ संघाने भारत-ब संघाचा ८७ धावांनी पराभव करीत देवधर चषकावर

कानपूर : सलामीवीर फैज फैजलची नाबाद शतकी खेळी, मुरली विजय व केदार जाधवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत-अ संघाने भारत-ब संघाचा ८७ धावांनी पराभव करीत देवधर चषकावर आपले नाव कोरले.नाणेफेक जिंकून भारत-अ संघाने फलंदाजी स्वीकारली. फैजलने ११२ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १०० धावांची खेळी केली. त्याला विजयने ९१ चेंडूंत ३ चौकार व तीन षटकार फटकावित ६९ धावांची सुरेख साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर केदार जाधवने ३९ चेंडूंत ४ चौकार व २ षट्कारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी करीत संघाला ७ बाद २८६ धावांपर्यंत मजल गाठून दिली. विजयासाठी २८७ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारत-ब संघाचा डाव ४०.४ षटकांत १९९ धावांत संपुष्टात आला. सामन्यात एक दोन नव्हे तर चार-पाच जीवनदान मिळाल्यानंतरही फलंदाजांना फायदा उठविता आला नाही. त्यांचा निम्मा संघ ५४ धावांतच तंबूत परतला. स्टुअर्ट बिन्नी (६०) व सुर्यकुमार यादव (४५) यांनीे भारत-ब कडून सर्वाधिक धावा काढून संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)