शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवले

By admin | Published: June 13, 2017 4:42 AM

भारताने दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला, या विजयाने भारताने उपांत्य फेरीत जागा नक्की केली. दक्षिण आफ्रिकेने ज्या प्रकारचा खेळ केला, त्यामुळे मी नक्कीच

- अयाझ मेमन भारताने दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला, या विजयाने भारताने उपांत्य फेरीत जागा नक्की केली. दक्षिण आफ्रिकेने ज्या प्रकारचा खेळ केला, त्यामुळे मी नक्कीच हैराण झालो आहे. पूर्ण सामन्यात असे वाटले नाही की, हा एक मजबूत संघ आहे. उलट वाटत होते की, आफ्रिकेचा संघ एक कमकुवत संघ आहे. कोण म्हणेल की, हा संघ जगातील अव्वल क्रमांकावर असलेला संघ आहे? ज्या पद्धतीने ते मैदानावर उतरले; वाटलेच नाही की, हे खेळाडू एक चांगली रणनीती बनवून मैदानावर आले आहेत. ए.बी. डिव्हिलियर्स, डेव्हिड मिलर ज्या पद्धतीने धावबाद झाले, ते पाहून आफ्रिकेचे खेळाडू घाबरून खेळत आहे, असेच वाटत होते. त्याशिवाय असे वाटत होते की, काहीसे दचकून खेळत आहेत. हाशीम आमला आणि क्विंटन डी कॉक हे खूप शानदार फलंदाजी करतात. मोकळेपणाने फटके खेळण्यासाठी ते ओळखले जातात. मात्र, भारताची जलदगती गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षणाने त्यांच्यावर अंकुश लावला होता. तरीही त्यांनी पहिल्या गड्यासाठी चांगली भागिदारी केली. मात्र, त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडच्या वातावरणात १९१ ही धावसंख्या खूप मोठी नक्कीच नाही. गोलंदाजांना स्विंग मिळत नाही, तेव्हा ही धावसंख्या खूपच कमी होते. मला वाटते की, दक्षिण आफ्रिकेने त्यांचा चोकर्सचा शिक्का सिद्ध केला. मला आधी वाटत होते की, ही माध्यमांमध्ये रंगवली जाणारी चर्चा आहे. मात्र, गेल्या २७ वर्षात दक्षिण आफ्रिकेला आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. मात्र, रँकिंग बदलत असते. जर तुम्ही एकही मोठा चषक घेऊन जाऊ शकत नाही, तर या रॅँकिंगचा काहीच फायदा नाही. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देऊ शकत नाही. भारताच्या खेळाचा विचार केला, तर संघाचा खेळ उत्कृष्ट होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले. कुठेही वाटले नाही की, भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. काही निराशा आहे, त्या उलट वाटले की, भारतीय संघात उपांत्य फेरीत पोहोचण्याची आणि विजयाची भूक आहे. भारताने नाणेफेक जिंकले, हा नशिबाचा भाग झाला. फक्त नाणेफेक जिंकल्याने फार काही होत नसते. ज्यापद्धतीने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण झाले, त्यामुळे संघाने हा सामना जिंकला. हार्दिक पांड्याकडून एक झेल सुटला होता. रिटर्न कॅच पकडणे सोपे नसते. त्याशिवाय भारताने जी स्फूर्ती दाखवली, ती विलक्षण होती. दोन धावांएवजी एकच धाव दिली. चौकार अडवले आणि धावबाददेखील उत्तम केले. यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांमध्ये चांगला ताळमेळ होता. गोलंदाजीतही चांगले बदल केले. आर. अश्विनला पुन्हा संघात घेतले. गडी बाद करण्यासाठी गरज असलेले गोलंदाज योग्यपणे वापरले. आफ्रिकेकडे तीन डावखुरे फलंदाज असल्याने चांगल्या फिरकीपटूची गरज असते. रवींद्र जाडेजानेही चांगली गोलंदाजी केली, विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याला या स्पर्धेत आतापर्यंत एकही गडी बाद करता आला नव्हता. त्याने या सामन्यात दोन गडी बाद केले. त्याला सामनावीराचा बहुमानदेखील मिळाला, त्याचा आत्मविश्वास यामुळे वाढला असेल. शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंह यांची फलंदाजी अप्रतिम होती. १२८ धावांची भागिदारी अशी केली; जसे ते मैदानात सहजतेने फिरण्यासाठी आले होते. हा एक खूप चांगला खेळ होता. आता विराट कोहली आणि कंपनीचे लक्ष्य अंतिम फेरीवर नक्कीच आहे.

(संपादकीय सल्लागार)