शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

भारत अंतिम फेरीत

By admin | Published: March 02, 2016 2:58 AM

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत

आशिया चषक टी-२० : विराटची अर्धशतकी खेळी; लंकेवर ५ गड्यांनी मातमिरपूर : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला पाच गड्यांनी पराभूत करीत सलग तिसऱ्या विजयासह स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.लंकेने नाणेफेक गमाविल्यानंतर हार्दिक पंड्या (२६ धावांत दोन बळी) आणि जसप्रीत बुमराह (२७ धावांत दोन बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे ९ बाद १४२ अशी आव्हानात्मक मजल गाठली. चमारा कपुगेदरा याने सर्वाधिक ३० धावांचे योगदान दिले. तळाच्या स्थानावर आलेल्या मिलिंदा सिरीवर्धना याने १७ चेंडूंत २२ आणि थिसारा परेराने सहा चेंडूंत १७, तसेच नुवान कुलसेकरा याने नऊ चेंडूंत १३ धावा केल्या. भारताची एक वेळ २ बाद १६ अशी पडझड झाली होती. अशा वेळी पाकवरील विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कोहलीने ४७ चेंडूंत नाबाद ५६ धावा फटकवित संयमी खेळी केली. युवराजने १८ चेंडू खेळून ३५ धावा ठोकल्या. यादरम्यान सिक्सरकिंग युवीने खास शैलीत फटके मारले. धोनीनेही एक षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन केले. विजयी चौकार विराटने मारताच १९.२ षटकांत ५ बाद १४२ धावा करीत सामना संपविला. भारताचा यंदा नऊ टी-२० सामन्यांतील हा आठवा विजय होता. दुसरीकडे श्रीलंकेने तीन सामन्यांत हा दुसरा पराभव पत्करला. यामुळे लंकेच्या अंतिम फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.टी-२० मध्ये धोनीचे यष्टिमागे बळींचे अर्धशतक पूर्णमिरपूर : भारतीय कर्णधार व यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिपाठी बळींचे अर्धशतक पूर्ण केले. धोनीने श्रीलंकेविरुद्ध आशिया कप स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या गोलंदाजीत दिनेश चंडीमलचा झेल घेत यष्टिपाठी ५० बळी घेण्याची कामगिरी केली. धोनीने त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शेहान जयसूर्याचा झेल टिपला. भारतीय कर्णधाराने ६१ व्या लढतीत हा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा यष्टिरक्षक ठरला. पाकिस्तानच्या कामरान अकमलने ५४ सामन्यांत ६० बळी घेतले असून या यादीत तो अव्वल स्थानी आहे. >> धावफलकश्रीलंका : दिनेश चंडीमल झे. धोनी गो. नेहरा ०४, तिलकरत्ने दिलशान झे. आश्विन गो. पांड्या १६, शेहान जयसूर्या झे. धोनी गो. बुमराह ०३, चमारा कपुगेदरा झे. पांड्या गो. बुमराह ३०, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज त्रि. गो. पांड्या १८, मिलिंदा सिरीवर्धना झे. रैना गो. आश्विन २२, दासून शनाका धावबाद ०१, थिसारा परेरा यष्टिचित धोनी गो. आश्विन १७, नुवान कुलसेकरा धावबाद १३, दुश्मंता चमीरा नाबाद २. अवांतर : १०. एकूण : २० षटकांत ९ बाद १३८. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२३-१, जसप्रीत बुमराह ४-०-२७-२, हार्दिक पांड्या ४-०-२६-२, युवराज सिंग १-०-३-०, रवींद्र जडेजा २-०-१९-०, रविचंद्रन आश्विन ४-०-२६-२, सुरेश रैना १-०-९-०.भारत : शिखर धवन झे. चंडीमल गो. कुलसेकरा १३, रोहित शर्मा झे. कपुगेदरा गो. कुलसेकरा १५, विराट कोहली नाबाद ५६, सुरेश रैना झे. कुलसेकरा गो. शनाका २५, युवराजसिंग झे. कुलसेकरा गो. परेरा ३५, हार्दिक पंड्या त्रि. गो. हेराथ २, धोनी नाबाद ७, अवांतर : १, एकूण : १९.२ षटकांत ५ बाद १४२ धावा. गोलंदाजी : मॅथ्यूज ३-१६-०-०, कुलसेकरा ३-०-२१-२, परेरा ४-०-३२-१, शमीरा ४-०-२७-०, हेराथ ३.२-०-२६-१, शनाका १-०-७-१, सिरीवर्धने १-०-१३-०.>> ३ विजयांसह भारत ६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. बांगलादेश २ विजय व एका पराभवासह (४ गुण) दुसऱ्या स्थानी आहे.