शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

भारतात होणार पुरुष व महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 3:02 AM

भारत पुढील वर्षी महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपव्यतिरिक्त २०२१ मध्ये प्रथमच पुरुषांच्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविणार आहे

नवी दिल्ली : भारत पुढील वर्षी महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपव्यतिरिक्त २०२१ मध्ये प्रथमच पुरुषांच्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविणार आहे. एक वेळ प्रशासकीय अडचणीत सापडलेल्या बॉक्सिंग या खेळासाठी ही मोठी उपलब्धी आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) मॉस्कोमध्ये आपल्या कार्यकारी समितीच्या २ दिवसांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या वृत्तामुळे भारतीय बॉक्सिंगसोबत जुळलेल्या लोकांनी अपेक्षेप्रमाणे आनंद व्यक्त करताना या खेळासाठी ही नव्या युगाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे.डॉ. चिंग कुआ म्हणाले, ‘‘तुर्की बॉक्सिंग महासंघाच्या प्रस्तावानंतर ट्राबजोन २०१९ मध्ये जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या महिला बॉक्सिंग स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यास सज्ज राहील.’’भारताने यापूर्वी कधीच पुरुष विश्व चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविलेले नाही; पण २००६ मध्ये महिला चॅम्पियनशिपचे आयोजन केलेले आहे. भारताने यापूर्वी पुरुष बॉक्सिंगमध्ये १९९० मध्ये मुंबईत विश्वकप व २०१० मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल चॅम्पियनशिप या प्रमुख स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.भारतीय बॉक्सिंग महासंघावर प्रशासकीय गोंधळामुळे २०१२ ते २०१६ या कालावधीत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद मिळणे महत्त्वाचे मानले जात आहे.क्रीडामंत्री विजय गोयल यांनी टिष्ट्वट केले, ‘भारतीय बॉक्सिंग चाहते व खेळाडूंसाठी आनंदाचे वृत्त.’एआयबीए कार्यकारी समितीने २०१९ च्या महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद तुर्कीतील ट्राबजोनला बहाल केले आहे. एआयबीए २०१८ काँग्रेस रशियातील मॉस्कोमध्ये होईल.या वृत्तामुळे भारतीय बॉक्सिंग वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. यंदा होणाºया विश्व चॅम्पियनशिपसाठी निवड झालेल्या संघातील खेळाडूंसोबत फ्रान्स दौºयावर असलेले भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी दोन स्पर्धांचे यजमानपद मिळणे ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.भारताने पुरुष बॉक्सिंगमध्ये एकूण ३ पदके पटकावली आहेत. ही तिन्ही कांस्यपदके आहेत. पदकविजेत्या भारतीय बॉक्सरमध्ये विजेंदरसिंग (२००९), विकास कृष्णा (२०११) आणि शिव थापा (२०१५) यांचा समावेश आहे.महिला बॉक्सिंगचे मुख्य प्रशिक्षक गुरबक्षसिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे.संधू म्हणाले, ‘‘मी आज सकाळीच हे वृत्त खेळाडूंना दिले, त्यामुळे त्या उत्साहित होत्या. भारतीय बॉक्सिंग महासंघाने भारतासाठी प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद मिळविले आहे. अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी खेळाडूंवर आहे.’’पाच वेळा विश्व चॅम्पियन व आॅलिम्पिक पदकविजेती एम. सी. मेरी कोम हिने या वृत्तानंतर २००६ च्या आठवणींना उजाळा दिला. त्या वेळी तिने ४६ किलोगटात सुवर्णपदक पटकावले होते. आता ४८ व ५१ किलो गटांत खेळणारी मेरी कोम म्हणाली, ‘‘भारतासाठी हे आनंदाचे वृत्त आहे. जर फिटनेस राखता आला, तर ४८ किलो गटात सहभागी होईन. यामुळे माझ्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. २००६ मध्ये पटकावलेल्या सुवर्णपदकाचा क्षण मी कधीच विसरू शकत नाही.’’ (वृत्तसंस्था)एआयबीएचे अध्यक्ष डॉ. चिंग कुआ म्हणाले, ‘‘एआयबीए पुरुष विश्व चॅम्पियनशिप २०१९ मध्ये सोच्ची येथे होणार असून नवी दिल्ली येथे २०१२ च्या चॅम्पियनशिपचे यजमानपद बहाल करताना आनंद होत आहे. कारण भारतीय बॉक्सिंग महासंघाने खेळाच्या विकासासाठी आपली प्रतिबद्धता कायम राखली आहे.’’नीवा म्हणाले, ‘‘भारतीय बॉक्सिंगसाठी हे शानदार आणि निश्चितच ऐतिहासिक वृत्त आहे. यामुळे महासंघाची ताकद व संकल्प याची कल्पना येते. या स्पर्धांचे यजमानपद मिळविणे भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यासाठी निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी बॉक्सर अधिक मेहनत घेतील.’’भारताला प्रथमच दोन महत्त्वाच्या चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळालेले आहे. आमच्या प्रस्तावाला एआयबीएच्या अध्यक्षांनी सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. - अजयसिंग,अध्यक्ष, भारतीय बॉक्सिंग महासंघ