India in Paris Olympic 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक 2024 चे आयोजन करण्यात आले होते. 11 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकची सांगता झाली. दरम्यान यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. भारत एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह 71 व्या स्थानावर आहेत. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती पैसे मिळतात? तुम्हाला ऐकून धक्का बसले की, ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना एक रुपयाही दिला जात नाही, पण भारतातील सर्व सरकारे आणि मंत्रालये काही रुपये बक्षीस म्हणून खेळाडूंना देतात.
भारताने कोणत्या खेळात पदके जिंकली?मनू भाकरने पॅरिस 2024 मध्ये नेमबाजीत दोन कांस्यपदके जिंकली, ज्यात एक वैयक्तिक आणि दुसरे सरबज्योत सिंगच्या साथीने सांघीक खेळातील पदक आहे. तर, स्वप्नील कुसाळेनेदेखील नेमबाजीत कांस्यपदकावर नाव कोरले. याशिवाय, नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, तर पुरुष हॉकी संघानेही स्पेनचा पराभव करून कांस्यपदक आपल्या नावे केले. शेवटी, अमन सेहरावतने कुस्तीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
नेमबाजांना इतके पैसे मिळाले?मनू भाकरने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी याच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकली आहेत. तिला, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 30 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे. याशिवाय स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले, ज्याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मनू भाकरसोबत मिश्र सांघिक नेमबाजीत कांस्यपदक जिंकणाऱ्या सरबजोतला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 22.5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
हॉकी संघाला सर्वाधिक पैसे मिळाले2024 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. टीम इंडियाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. त्यांनी यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. हॉकी संघातील प्रत्येक सदस्यासाठी हॉकी इंडियाने 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, सपोर्ट स्टाफला प्रत्येकी ₹7.5 लाख मिळणार आहेत. याशिवाय, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी अमित रोहिदाससाठी 4 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
तुमची जबाबदारी नाही का? विनेश फोगाट प्रकरणावरुन शिवसेनेची पीटी उषांवर बोचरी टीका...
याशिवाय, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील प्रत्येक पथकातील सदस्याला 1 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. नीरज चोप्रा आणि अमन सेहरावत यांनीही भारतासाठी पदके जिंकली आहेत. मात्र, या दोन खेळाडूंसाठी अद्याप कोणतेही रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेले नाही. लवकरच या दोघांसाठीही काहीतरी घोषणा होईल, असे मानले जात आहे.