शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

भारत, न्यूझीलंडमधील अखेरचा सामना रोमहर्षक ठरेल

By admin | Published: October 29, 2016 3:25 AM

रांचीमध्ये पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन केल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना रोमांचक ठरणार आहे. न्यूझीलंड संघ मोठ्या धावसंख्येचा

- सुनील गावसकर लिहितो़रांचीमध्ये पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन केल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना रोमांचक ठरणार आहे. न्यूझीलंड संघ मोठ्या धावसंख्येचा बचाव करीत नव्हता. पण त्यांच्या गोलंदाजांनी केलेला मारा आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ त्यामुळे भारताला लक्ष्यापेक्षा २५ धावांचा अधिक पाठलाग करावा लागल्याचे दिसून आले. विशाखापट्टणम्मध्ये खेळपट्टीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. रणजी ट्रॉफी सामन्यांचा विचार करता येथे मोठी धावसंख्या उभारल्या गेलेली नाही. खेळपट्टी जर भंग झाली तर येथे फलंदाजी करणे आव्हान ठरेल. किवी संघाने डेवसिचचा समावेश करण्याचा चांगला निर्णय घेतल्यामुळे त्यांच्याकडे फिरकीचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला. डेवसिचने रांचीमध्ये मात्र सिम मारा केला. कारण ‘दव’ हा घटक महत्त्वाचा ठरत असल्यामुळे चेंडूवर ग्रीप मिळवण्यात अडचण भासत होती. सँटनर व ईश सोढी यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. भारतानेही केदार जाधवचा वापर केला. महाराष्ट्राच्या कर्णधाराने या मालिकेत केवळ बळीच घेतले असे नाही तर त्याने धावगतीवर अंकुश राखला. पांड्या आणि कुलकर्णी हे गोलंदाज महागडे ठरल्यामुळे जाधवच्या गोलंदाजीमुळे कर्णधाराला दिलासा मिळाला. पांड्याने गुप्टीलचा महत्त्वाचा बळी घेतला. पांड्याला सलग दुसऱ्या लढतीत निर्धारित १० षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही आणि संघव्यवस्थापनासाठी ही चिंतेची बाब आहे. फलंदाजांचे अपयश भारतीय संघासाठी महत्त्वाची चिंता ठरली आहे. रोहित शर्माला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसून, मनीष पांडे व जाधव अपयशी ठरल्यामुळे कोहलीवरील दडपण वाढले आहे. भारतीय संघाने दोन लढतीत मिळवलेल्या विजयामध्ये कोहलीचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. रांचीमध्येही तो अपयशी ठरला असे म्हणता येणार नसले तरी तो जर अर्धशतकापेक्षा कमी धावांवर बाद झाला तर भारताला धावफलकावर मोठी धावसंख्या उभारता येत नाही, हे सत्य आहे. कागदावर बघता भारतीय फलंदाजी तळापर्यंत असल्याचे दिसून येते. पण खरे बघता ही फलंदाजी पाचव्या क्रमांकानंतर संपलेली असल्याचे चित्र आहे आणि भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी सर्वच फॉर्मात आहेत, असे नाही. भारताला बुमराहची अनुपस्थिती जाणवली. डेथ ओव्हर्समध्ये तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. विशाखापट्टणम्मध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी तो ‘फिट’ असेल, अशी आशा आहे. न्यूझीलंड संघ रांचीतील कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. वन-डे मालिकेत विजय मिळवला तर कसोटी मालिकेतील अपयश त्यांना धुवून काढता येईल. (पीएमजी)