नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी नियमित कर्णधार व अनुभवी राणी रामपाल हिला विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या अनुपस्थितीमध्ये स्टार गोलरक्षक सविता पुनिया हिच्याकडे भारताचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे.
महिला हॉकी संघn गोलरक्षक : सविता पुनिया (कर्णधार), रजनी इ. बचावपटू : दीप ग्रेस इक्का (उपकर्णधार), उदिता, निक्की प्रधान, गुरजीत कौर.n मध्यरक्षक : निशा, सुशीला चानू, पुखराम्बम, नमिता टोप्पो, मोनिका, नेहा, ज्योती, लिलिमा मिंज.n फॉरवर्ड : नवनीत कौर, वंदना कटारिया, राजविंदर कौर, मरियाना कुजुर, सोनिका.