शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

भारत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत

By admin | Published: May 03, 2017 12:39 AM

भारताने सुरुवातीला चमकदार कामगिरी करीत आघाडी घेतली; पण तरी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेच्या साखळी लढतीत

इपोह : भारताने सुरुवातीला चमकदार कामगिरी करीत आघाडी घेतली; पण तरी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेच्या साखळी लढतीत मंगळवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या क्वॉर्टरमध्ये विश्व चॅम्पियन संघाला बरोबरीत रोखल्यानंतर भारताने २५ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या मैदानी गोलच्या जोरावर आघाडी घेतली होती, पण आॅस्ट्रेलियाने त्यानंतर तीन मैदानी गोल नोंदवत राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत वर्चस्व कायम राखले. आॅस्ट्रेलियातर्फे एडी ओकेनडेन (३० वा मिनीट), टॉम क्रेग (३४ वा मिनीट) आणि टॉम विकहॅम (५१ वा मिनीट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. भारतीय संघाने अखेरच्या क्वॉर्टरमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. अझलान शाह कपमध्ये नऊवेळा जेतेपद पटकावणाऱ्या आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन लढतींमध्ये ७ गुणांची कमाई केली आहे, तर गेल्या वर्षीच्या उपविजेत्या भारतीय संघाच्या खात्यावर तीन सामन्यांतून केवळ चार गुणांची नोंद आहे. आॅस्ट्रलियाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण भारतीय बचाव फळीने त्यांचे आक्रमण परतावून लावले. क्रेकला डायलन वोदरस्पूनच्या क्रॉसवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविता आला नाही. त्यानंतर दोन मिनिटांनी भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला. हरमनप्रीतला त्यावर गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. आकाशदीप सिंगने आठव्या मिनिटाला मनदीप सिंगला पास दिला, पण त्याला आॅस्ट्रेलियन बचावफळीला गुंगारा देण्यात अपयश आले. भारताला त्यानंतर पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण रुपिंदर पाल सिंगचा फ्लिकचा फटका आॅस्ट्रेलियन गोलकिपर टायलर लोवेलने सहजपणे थोपवला. आकाशदीपला त्यानंतर प्रदीप मोरच्या क्रॉसवर गोल नोंदवण्याची संधी होती, पण त्यात तो अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)दरम्यान, गोलकिपर श्रीजेश दुखापतग्रस्त झाला. त्याच्या स्थानी आकाश चिकटेने १३ व्या मिनिटापासून गोलकिपरची भूमिका बजावली. सरदार सिंगने २३ व्या मिनिटाला एक चांगली चाल रचली, पण आकाशदीपला चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविता आला नाही. अखेर २६ व्या मिनिटाला हरमनप्रीतने मैदानी गोल नोंदवित भारताला आघाडी मिळवून दिली. गोलकिपर चिकटेने आॅस्ट्रेलियाचा पेनल्टी कॉर्नर रोखला, पण ओकेनडेनने जेरमी हेवार्डच्या क्रॉसवर गोल नोंदिवत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. प्रत्युत्तरात भारताची चांगली चाल, पण ठरली व्यर्थक्रेगने त्यानंतर कर्णधार मॅथ्यू स्वानच्या पासवर गोल नोंदवित संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात भारताने चांगली चाल रचली, पण आॅस्ट्रेलियन गोलकिपरने भारताचे प्रयत्न हाणून पाडले. भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण हरमनप्रीतच्या फ्लिकवर गोलकिपरने उत्कृष्ट बचाव केला. आॅस्ट्रेलियातर्फे तिसरा गोल टॉम विकहॅमने नोंदवला. त्याने भारताच्या तीन बचावपटूंना गुंगारा देत मारलेला आक्रमक फटका थेट गोलजाळ्यात विसावला. भारताने अखेरच्या क्षणी आक्रमक पवित्रा स्वीकारला. गोलकिपरला हटवित एका अन्य खेळाडूला मैदानात उतरविले, पण आॅस्ट्रेलियाच्या बचावफळीने कुठलीही संधी दिली नाही.