गोल्ड कोस्ट (आॅस्ट्रेलिया) : भारतीय संघाने सुदीरमन चषक मिश्रसांघिक बॅडमिंटन स्पर्धेची बाद फेरी गाठली आहे. नवव्या मानांकित भारतीय संघाने काल रोमहर्षक सामन्यात पाचवा मानांकित इंडोनेशियावर ४-१ ने आश्चर्यकारक विजयाची नोंद करीत बाद फेरीचा मार्ग प्रशस्त केला होता.इंडोनेशियाने आज ग्रुप एक लढतीत डेन्मार्कचा ३-२ ने पराभव केला. ‘ग्रुप आॅफ डेथ’मधील सर्व तिन्ही संघ भारत, डेन्मार्क आणि इंडोनेशिया यांनी दोनपैकी एकेक सामना जिंकला. त्यापैकी पहिल्या दोन संघांनी गेममध्ये मिळविलेल्या अधिक गुणांच्या आधारे उपांत्यपूर्व फेरी गाठली. साखळी लढतीनंतर गटात डेन्मार्क ६-४ने पहिल्या क्रमांकावर, भारत ५-५ने दुसऱ्या आणि इंडोनेशिया ४-६ने तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. याआधी २०११ मध्ये भारतीय संघ बाद फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. मागच्या दोन सत्रांत मात्र साखळी फेरीचा अडथळा पार करण्यात भारतीय संघाला अपयश आले होते.
भारत ६ वर्षांनंतर बाद फेरीत
By admin | Published: May 25, 2017 1:09 AM